Bigg Boss 13मध्ये सहभागी होण्यासाठी शहनाज गिलला किती मानधन मिळालं होतं? खुलासा करत अभिनेत्री म्हणाली, “मला सगळ्यात..”

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 04:19 PM2023-04-18T16:19:57+5:302023-04-18T16:21:00+5:30

बिग बॉस १३चा सीझन गाजवलेल्या शहनाज गिलने पहिल्यांदाच खुलासा केला आहे की ‘बिग बॉस १३’ मध्ये तिला इतर स्पर्धकांच्या तुलनेत नेमकं किती मानधन मिळाले होते.

Shehnaaz gill claimed that she was the cheapest paid contestant on bigg boss season 13 | Bigg Boss 13मध्ये सहभागी होण्यासाठी शहनाज गिलला किती मानधन मिळालं होतं? खुलासा करत अभिनेत्री म्हणाली, “मला सगळ्यात..”

Bigg Boss 13मध्ये सहभागी होण्यासाठी शहनाज गिलला किती मानधन मिळालं होतं? खुलासा करत अभिनेत्री म्हणाली, “मला सगळ्यात..”

googlenewsNext


पंजाबची कटरिना कैफ ते बिग बॉसमधील लोकप्रिय स्पर्धक असा प्रवास करणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे शहनाज गिल. आपल्या मस्तीखोर स्वभावामुळे आणि सौंदर्यामुळे शहनाजने चाहत्यांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं. त्यामुळेच आज शहनाज गिलचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं. शहनाज बिग बॉसच्या १३ व्या सीझनमुळे प्रकाश झोतात आली. या सीझनमधील तिची आणि सिद्धार्थ शुक्लाच्या जोडीला प्रेक्षकांनी अधिक पसंत केलं. पण तुम्हाला माहिती आहे का?. शहनाजला बिग बॉसच्या १३ व्या सीझनसाठी किती मानधन मिळालं होतं ते.  खुद्द शहनाजने कपिलच्या कार्यक्रमात याबाबतचा खुलासा केला आहे.

 शहनाज लवकरच सलमानच्या आगामी चित्रपट ‘किसी का भाई किसी जान’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदापर्ण करणार आहे. सिनेमाच्या प्रमोशनसाठी संपूर्ण टीमने कपिल शर्माच्या शोमध्ये हजेरी लावली. यावेळी कपिल शर्माने शहनाजला गंमतीने विचारले, ती सलमान खान होस्ट असलेल्या बिग बॉसमध्ये दिसली आता ती सलमानच्या चित्रपटातही दिसणार आहेस.  बिग बॉसचे काही पेमेंट बाकी होते म्हणून तू चित्रपटात ते वसूल करायला आली आहेस? हे ऐकल्यानंतर शहनाज म्हणाली, ‘मला बिग बॉसमध्ये खूप कमी पेमेंट मिळाले, त्या सीझनमध्ये मी सर्वात स्वस्त होते. पण नंतर मी सगळ्यात महाग बनून बाहेर पडले.

रिपोर्टनुसार बिग बॉस १३ मध्ये शहनाजला दर आठवड्याला ४.५ लाख रुपये मिळाले होते. इतरांच्या तुलनेत हे मानधन खूपच कमी होतं. मात्र हा सीझन शहनाजने गाजवला होता. 

दरम्यान, सलमानचा किसी का भाई किसी की जान हा सिनेमा तमिळ चित्रपट वीरम याचा रिमेक आहे. या सिनेमामध्ये शहनाजसोबत पलक तिवारी, विजेंदर सिंग,पूजा हेगडे यांसारखे कलाकार झळकणार आहेत.  २१ एप्रिल २०२३ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे.
 

Web Title: Shehnaaz gill claimed that she was the cheapest paid contestant on bigg boss season 13

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.