आमिर अलीसोबतच्या नात्याच्या अफवांवर शमिता शेट्टी भडकली, म्हणाली, 'देशात इतरही मुद्दे आहेत'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 01:07 PM2023-01-31T13:07:34+5:302023-01-31T13:08:37+5:30

व्हिडिओमध्ये आमिर शमिताच्या कमरेवर हात ठेवून गालावर kiss करताना दिसत आहे आणि यामुळे इंटरनेटवर दोघांच्या डेटिंगच्या अफवांना उधाण आले आहे.

shamita shetty gives explaination over rumours about her dating with actor amir ali | आमिर अलीसोबतच्या नात्याच्या अफवांवर शमिता शेट्टी भडकली, म्हणाली, 'देशात इतरही मुद्दे आहेत'

आमिर अलीसोबतच्या नात्याच्या अफवांवर शमिता शेट्टी भडकली, म्हणाली, 'देशात इतरही मुद्दे आहेत'

googlenewsNext

'बिग बॉस 15' (Bigg Boss) फेम शमिता शेट्टी अलीकडेच जवळचा मित्र आमिर अलीसोबत (Amir Ali) स्पॉट झाल्यामुळे चर्चेत आली. एका व्हिडिओमध्ये आमिर शमिताच्या कमरेवर हात ठेवून गालावर kiss करताना दिसत आहे आणि यामुळे इंटरनेटवर दोघांच्या डेटिंगच्या अफवांना उधाण आले आहे. जेव्हापासून शमिता शेट्टी आणि आमिरचा हा व्हिडिओ समोर आला आहे तेव्हापासून इंटरनेटवर खळबळ उडाली आहे आणि दोघेही एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. दरम्यान शमिताने या चर्चा धुडकावत स्पष्टीकरण दिले आहे.

काय म्हणाली शमिता शेट्टी ?

आमिर अली सोबतच्या डेटिंगच्या चर्चांवर शमिताने ट्वीट करत स्पष्ट सांगितले. ती म्हणाली,  'मी  समाजाची मानसिकता पाहून त्रासलेली आहे. प्रत्येक कृती  आणि प्रत्येक व्यक्ती कोणतीही वास्तविकता तपासल्याशिवाय निर्णय का घेतो? नेटिझन्सच्या छोट्या विचारांपलीकडे सुद्धा काही गोष्टी असू शकतात. '

ती पुढे म्हणाली, आता यावर बोलायची वेळ आली आहे. 'मी सध्या सिंगल आहे आणि आनंदी आहे. देशातील इतर महत्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष देऊया.'



शमिता शेट्टी आणि आमिर अलीला नुकतेच एका पार्टीत एकत्र पाहिल्यानंतर या चर्चा सुरु झाल्या. आमिर शमिताला त्याच्या कारमध्ये घेऊन तिच्या गालावर किस करताना दिसला. यामुळे नेटिझन्सने दोघांनाही पूर्वीचे नाते विसरलात का असे म्हणत ट्रोल केले. शमिता याआधी राकेश बापटसोबत रिलेशनशिप मध्ये होती. बिग बॉस मध्येच दोघांची ओळख झाली होती. तर आमिर अलीचा अभिनेत्री टीव्ही अभिनेत्री संजिदा शेख सोबत घटस्फोट झाला आहे.

Web Title: shamita shetty gives explaination over rumours about her dating with actor amir ali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.