शक्तिमान ते कपाला... आता कसे दिसतात, काय करतात ‘शक्तिमान’चे हे कलाकार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2020 11:16 AM2020-04-01T11:16:17+5:302020-04-01T11:17:40+5:30

‘शक्तिमान’मधील कलाकार ओळखताही येणार नाहीत इतके बदलले आहेत.

shaktimaan cast then now from mukesh khanna to kapala geeta viswas-ram | शक्तिमान ते कपाला... आता कसे दिसतात, काय करतात ‘शक्तिमान’चे हे कलाकार

शक्तिमान ते कपाला... आता कसे दिसतात, काय करतात ‘शक्तिमान’चे हे कलाकार

googlenewsNext

छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना वेड लावणारी आणि भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासात कधी नव्हे इतकी लोकप्रिय ठरलेली ‘शक्तिमान’ हा मालिका लॉकडॉऊनच्या काळात पुन्हा एकदा प्रसारित होत आहे. साहजिकच प्रेक्षक सुखावले आहेत.  1997 ते 2005 मध्ये आलेल्या या मालिकेने लोकप्रियतेचे अनेक विक्रम तोडलेत. यातील सर्वच व्यक्तिरेखा लोकप्रिय झाल्यात. गंगाधरपासून तर तमराज किलविशपर्यंत सगळ्यात व्यक्तिरेखा लोकांच्या पसंतीत उतरल्या. आज इतक्या वर्षांनंतर या व्यक्तिरेखा साकारणारे कलाकार कसे दिसतात? काय करतात? चला जाणून घेऊ यात...

  गंगाधर विद्याधर ओमकार नाथ शास्त्री

शक्तिमान आणि पंडित गंगाधर विद्याधर ओमकार नाथ शास्त्रीची भूमिका साकारणारे अभिनेते मुकेश खन्ना यांना कोण विसरू शकतो. मुकेश खन्ना यांना शक्मिमानच्या रूपात  अफाट लोकप्रियता मिळाली. शक्तिमाननंतर मुकेश खन्ना यांनी अनेक टीव्ही शो व चित्रपट केलेत. सध्या ते स्वत:चे युट्यूब चॅनल चालवतात आणि शक्तिमानपासून तर विविध मुद्यांवर व्हिडीओ शेअर करतात.

गीता विश्वास

शक्तिमानच्या प्रेयसीची अर्थात गीता विश्वासची भूमिका साकारणारी अभिनेत्री वैष्णवी मर्चंट (महंत) यांनी शक्मिमाननंतर अनेक मालिका व चित्रपटांत काम केले. इतक्या वर्षांत वैष्णवी प्रचंड बदल्या आहेत. 2019 साली प्रदर्शित ‘दोस्ती के साइड इफेक्ट’ या सिनेमात त्या झळकल्या होत्या.

गीता विश्वास्

वैष्णवी मर्चंट यांच्याआधी गीता विश्वासची भूमिका किट्टू गिडवानी हिने साकारली होती. शक्तिमानमध्ये ती पत्रकाराच्या भूमिकेत होती. यानंतर वैष्णवी यांनी तिला रिप्लेस केले होते.

तमराज किलविश

शक्तिमानमध्ये शोच्या हिरोसोबत सर्वाधिक मुलांच्या सर्वाधिक लक्षात राहिला तो या शोमधील व्हिलन. शो मधील व्हिलन म्हणजे तमराज किलविश अर्थात अभिनेता सुरेंद्र पाल आता असे दिसतात.  

नौरंगी

शक्तीमानमध्ये नौरंगी बनून सर्वांच्या मनावर राज्य करणारे किशोर आनंद भानुशाली आता असे दिसतात. त्यांनी भाभी जी घर पर है या मालिकेतूनही प्रेक्षकांचं मनोरंजन केले आहे.  

 मेयर जेजे

याला ओळखले? हा आहे अभिनेता नवाब शाह. याने शक्तिमानमध्ये मेयर जेजेची भूमिका साकारली होती. आज नवाब शाह बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आहे. नुकतेच नवाबने अभिनेत्री पूजा बत्रासोबत लग्न केले़ 

शलाका

काळी मांजर आणि शलाकाची भूमिका  अभिनेत्री अश्विनी कासकर हिने साकारली होती. आज ती कशी दिसते जरा बघाच.
 
महागुरू 

अभिनेते टॉम आॅल्टर शक्मिमानमध्ये महागुरू बनले होते. 2017 साली स्किन कॅन्सरने त्यांचे निधन झाले. त्यांनी अनेक सिनेमांत काम केले.

कपाला

छातीच्या केसांमधून आग काढणारा तांत्रिक कपाला आठवतो? इंटरनेटवर उपलब्ध माहितीनुसार, फकीरा नावाच्या अभिनेत्याने ही भूमिका साकारली होती. सध्या फकीरा कुठे आहेत काय करतात, कुणालाही ठाऊक नाही.

डॉ. जैकाल

डॉ. जैकाल म्हणजे ललित सरिमू यांना पाहण्याची संधी मिळू शकते.


 
 

Web Title: shaktimaan cast then now from mukesh khanna to kapala geeta viswas-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.