शाहरुख खान सांगतोय, आजवर आयुष्याने मला शिकवले हे धडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2018 15:24 IST2018-01-09T09:54:57+5:302018-01-09T15:24:57+5:30

शाहरुख खानने बॉलिवूडमध्ये एकाहून एक हिट चित्रपट दिले आहेत. बॉलिवूडचा बादशहा अशी त्याची ओळख आहे. मोठ्या पडद्याप्रमाणे त्याने छोट्या ...

Shahrukh Khan is telling me, life has taught me these lessons today | शाहरुख खान सांगतोय, आजवर आयुष्याने मला शिकवले हे धडे

शाहरुख खान सांगतोय, आजवर आयुष्याने मला शिकवले हे धडे

हरुख खानने बॉलिवूडमध्ये एकाहून एक हिट चित्रपट दिले आहेत. बॉलिवूडचा बादशहा अशी त्याची ओळख आहे. मोठ्या पडद्याप्रमाणे त्याने छोट्या पडद्यावर देखील त्याचे एक प्रस्थ निर्माण केले आहे. सध्या तो ‘स्टार प्लस’वरील ‘टेड टॉक्स इंडिया नई सोच’ या कार्यक्रमात सूत्रसंचालकाची भूमिका बजावत आहे. या कार्यक्रमातील त्याचे सूत्रसंचालन प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे.  व्हँकुव्हर येथे टेड टॉक्स कार्यक्रमात केलेल्या प्रेरणादायी भाषणानंतर त्याने तेथील प्रेक्षकांची मने जिंकली होती. पण त्या कार्यक्रमानंतर शाहरूखला टेड टॉक्स कार्यक्रमाच्या संकल्पनेबद्दल विशेष कुतुहल वाटू लागले होते आणि म्हणूनच हा कार्यक्रम भारतीय प्रेक्षकांसाठीही उपलब्ध करण्यासाठी तो प्रयत्नशील होता आणि आता तर हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस देखील आला आहे. हा कार्यक्रम प्रेक्षकांना प्रचंड आवडत असल्याचे ते सोशल मीडियाच्या द्वारे सांगत आहेत. 
शाहरुख खानने आजवर प्रचंड मेहनत केल्यामुळेच त्याला यश मिळवता आले आहे. त्यामुळे त्याचे जीवन हे लोकांसाठी प्रेरणादायी आहे. शाहरुखने फौजी या मालिकेपासून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. एका मालिकेत भूमिका साकारणारा कलाकार आज बॉलिवूडवर राज्य करत आहे. शाहरुख आपले व्यवसायिक आणि वैयक्तिक आयुष्य यांच्यात नेहमीच ताळमेळ घालतो. तो एक सर्वोत्तम अभिनेता असण्यासोबतच खूप चांगला पती, वडील आहे. एका सामान्य कुटुंबातून आलेल्या शाहरुखने आज मिळवलेले हे यश खरेच वाखण्याजागे आहे. शाहरुखला आयुष्यात अनेक चढ-उतारांना तोंड द्यावे लागले आहे. या चढ-उतारांमधून तो अनेक धडे शिकला आहे. याविषयी तो सांगतो, मी माझ्या आयुष्यातून दोन महत्त्वाचे धडे शिकलो आहे. एक आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे जसे लोकांनी तुमच्याशी वागावे असे तुम्हाला वाटत असेल तसेच तुम्ही देखील इतरांशी वागायला हवे आणि दुसरे म्हणजे ज्यामुळे मी आज जो काही आहे ते केवळ सॉरी आणि थॅँक्यू या दोन शब्दांमुळे. हे दोन्ही शब्द तुमच्या आयुष्यात अतिशय महत्त्वाचे असतात. तुम्ही कोणाला सॉरी अथवा थॅँक्यू बोललात तर तुम्ही छोटे अथवा मोठे होणार नाहीत. पण यामुळे समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर जे हास्य फुलते त्याची किंमत पैशांपेक्षा कितीतरी जास्त असते. 

Also Read : शाहरुख खान सांगतोय, ही अभिनेत्री दिसते साडीत अतिशय सुंदर

Web Title: Shahrukh Khan is telling me, life has taught me these lessons today