​दिल है हिंदुस्तानीच्या सेटवर शाहरुख खानने धरला जबरा या गाण्यावर ताल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2017 11:40 IST2017-01-17T11:40:32+5:302017-01-17T11:40:32+5:30

रईस या चित्रपटाचे सध्या जोरदार प्रमोशन सुरू आहे. प्रमोशन करण्याची एकही संधी शाहरुख खान सोडत नाहीये. नुकताच तो दिल ...

Shahrukh Khan on the sets of Dil Hai Hindustani | ​दिल है हिंदुस्तानीच्या सेटवर शाहरुख खानने धरला जबरा या गाण्यावर ताल

​दिल है हिंदुस्तानीच्या सेटवर शाहरुख खानने धरला जबरा या गाण्यावर ताल

स या चित्रपटाचे सध्या जोरदार प्रमोशन सुरू आहे. प्रमोशन करण्याची एकही संधी शाहरुख खान सोडत नाहीये. नुकताच तो दिल है हिंदुस्तानी या मालिकेच्या सेटवर गेला होता. तिथे जाऊन त्याने स्पर्धक आणि परीक्षकांसोबत खूप धमालमस्ती केली. या कार्यक्रमातील स्पर्धकांचे आवाज ऐकून तर तो खूपच खूश झाला होता. अनेक गुणी गायक या कार्यक्रमात असल्याचे त्याने मत व्यक्त केले. 
शाहरुख खानच्या फॅन या चित्रपटातील जबरा हे गाणे प्रचंड गाजले होते. या गाण्याची अरबी आवृत्ती दिल है हिंदुस्तानी या मालिकेतील हैतम या स्पर्धकाने गावून दाखवली. जबरा या गाण्याचे हे अरबी व्हर्जन शाहरुख खानला इतके आवडले की या गाण्यावर ताल धरण्याचा मोह त्याला आवरला नाही आणि त्याने स्टेजवर जाऊन या गाण्यावर नृत्य सादर केले. या कार्यक्रमात करण जोहर, बादशहा आणि शेखर रावजियानी परीक्षकाची भूमिका बजावत आहेत. शेखर हा जबरा या गाण्याचा संगीतकार आहे. त्याने हे गाणे ऐकल्यानंतर त्याने सांगितले की, जबरा या गाण्याची धून 11 भाषांमध्ये तयार करण्यात आली होती. त्यापैकी अरबी भाषेतील गाणे केवळ आखाती देशामध्येच नव्हे तर भारतातही प्रचंड लोकप्रिय आहे. 
दिल है हिंदुस्तानी या कार्यक्रमातील सगळ्याच स्पर्धकांचे शाहरुख खानने प्रचंड कौतुक केले. हैतमचा आवाज तर शाहरुखला प्रचंड आवडला. त्याने त्याला त्याच्या भविष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच बॉलिवुडमधील एक गाणे एक परदेशी गायक गातो आहे हे पाहून मन भरून आले असल्याचेही त्याने सांगितले.  

Web Title: Shahrukh Khan on the sets of Dil Hai Hindustani