​‘झी टीव्ही’वरील ‘दिल ढूँढता है’च्या सेटवर शिव्या पठाणियाने केली चाहत्याची इच्छा पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2017 14:18 IST2017-12-08T08:48:02+5:302017-12-08T14:18:02+5:30

‘झी टीव्ही’वर अलीकडेच सुरू झालेल्या ‘दिल ढूँढता है’ या मालिकेने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. या मालिकेची कथा, या मालिकेतील ...

On the set of 'Dil Detects' on Zee TV, Shiva Pathania made a wish for the fans | ​‘झी टीव्ही’वरील ‘दिल ढूँढता है’च्या सेटवर शिव्या पठाणियाने केली चाहत्याची इच्छा पूर्ण

​‘झी टीव्ही’वरील ‘दिल ढूँढता है’च्या सेटवर शिव्या पठाणियाने केली चाहत्याची इच्छा पूर्ण

ी टीव्ही’वर अलीकडेच सुरू झालेल्या ‘दिल ढूँढता है’ या मालिकेने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. या मालिकेची कथा, या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. या मालिकेतील सगळ्याच कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. अलीकडेच शिव्या पठाणिया म्हणजेच तुमच्या लाडक्या रावीला या मालिकेच्या सेटवर एक चाहता भेटण्यास आला होता. त्याला त्याचा वाढदिवस तिच्यासोबत साजरा करायचा होता. कासिम नावाचा हा चाहता या मालिकेचा एकही भाग चुकवत नाही. या मालिकेतील रावीच्या तर तो प्रेमात पडला आहे. तिने आपल्या वाढदिवसाचा केक कापावा, अशी त्याची इच्छा होती. 
आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी कासिमने मग ‘दिल ढूँढता है’ या मालिकेचा सेट गाठला. शिव्याने आपल्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी व्हावे, अशी विनंती त्याने तिला केली. अर्थात रावी तिच्या कामात अतिशय व्यग्र असेल, याची त्याला पूर्ण जाणीव होती. तरीही तो तिच्या सेटबाहेर तिची चार तास प्रतीक्षा करीत उभा होता. अखेरीस शिव्याने त्याची भेट घेतली. त्याच्या केकवर आपले छायाचित्र पाहून ती हरखूनच गेली. याविषयी शिव्या सांगते, “कासिमचे हे प्रेम पाहून मी फार भारावून गेले आणि त्याचे आभार कसे मानावेत हेच मला कळेना. आजवर माझ्यावर कोणीही अशा तऱ्हेने प्रेम केले नव्हते. इतक्या दूरून आलेल्या कासिमला पाहून मी थक्क झाले. तो माझी अनेक तास प्रतीक्षा करीत होता, हे ऐकून मला आश्चर्याचा धक्का बसला. पण या सगळ्यात मला माझ्या भूतकाळातील एक किस्सा आठवला. काही वर्षांपूर्वी रणबीर कपूरची एक झलक दिसावी, यासाठी मी त्याच्या घराबाहेर अनेक तास वाट पाहात उभी होते. इतका वेळ मी उभी राहूनही मला तो दिसलाच नाही. माझं ते स्वप्न अजूनही अपूर्ण राहिलं आहे. पण निदान कासिमचे एक स्वप्न मला पूर्ण करता आले आणि त्याच्या चेहऱ्यावर मला हास्य फुलवता आले, याचे मला समाधान आहे.”

Web Title: On the set of 'Dil Detects' on Zee TV, Shiva Pathania made a wish for the fans