सेल्फी विथ पोस्टर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2016 12:35 IST2016-04-02T19:35:27+5:302016-04-02T12:35:27+5:30
पाडव्याच्या मुर्हतावर प्रदर्शित होणारा वृदावंन या चित्रपटाची चर्चा जोर धरू लागली आहे.तसेच या चित्रपटातील कलाकार पूजा सावंत, वैदेही, राकेश ...

सेल्फी विथ पोस्टर
प डव्याच्या मुर्हतावर प्रदर्शित होणारा वृदावंन या चित्रपटाची चर्चा जोर धरू लागली आहे.तसेच या चित्रपटातील कलाकार पूजा सावंत, वैदेही, राकेश बापट या कलाकारांसहित पूर्णटीम चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तयारीला लागलेले दिसत आहेत. पूजा व वैदही यांनी प्रमोशनचा फंडा लढवित चक्क पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर वृदावंन चित्रपटाच्या होर्डिंगसोबत सेल्फी काढले आहे. याबाबत लोकमत सीएनएक्सने पूजा सावंतशी संवाद साधला असत ती म्हणाली, चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आम्ही एक खास मिनी बसच केली आहे. या बसवरदेखील चित्रपटाचे नाव आहे. तसेच प्रमोशनसाठी पुण्याला येत असताना मुंबई-पुणे हायवेवर चित्रपटाचे सर्वात मोठे होर्डिग लागले आहे. ते पाहता, आम्ही खूप एक्सायटेंड झालो होतो. मग वैदेही आणि मी या होर्डिंगसोबत एक सेल्फी घेतला. पण काहीही असो, नकळत केलेला प्रमोशनचा हा फंडा फार भारी वाटला.