स्त्रीवेषातील कलाकार नेमका आहे तरी कोण? आहे सर्वांच्याच परिचयाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 19:25 IST2021-02-10T19:21:13+5:302021-02-10T19:25:00+5:30

‘तुझसे है राबता’ या मालिकेतील या दोन प्रमुख व्यक्तिरेखांमुळे कथानकाला विलक्षण कलाटणी मिळत असून त्यामुळे प्रेक्षकांमध्ये मालिकेविषयी प्रचंड कुतुहल निर्माण झाले आहे.

Sehban Azim dons a female avatar for the first time in Tujhse Hai Raabta | स्त्रीवेषातील कलाकार नेमका आहे तरी कोण? आहे सर्वांच्याच परिचयाचा

स्त्रीवेषातील कलाकार नेमका आहे तरी कोण? आहे सर्वांच्याच परिचयाचा

मन गुंतवून ठेवणारे कथानक आणि कल्याणी (रीम शेख) व मल्हार राणे (सेहबान अझीम) यासारख्या व्यक्तिरेखांच्या सुस्पष्ट चित्रणामुळे ‘झी टीव्ही’वरील ‘तुझसे है राबता’ ही मालिका प्रेक्षकांमध्ये खूपच लोकप्रिय बनली आहे. या दोन मुख्य व्यक्तिरेखांच्या आयुष्याला मिळणार्‍्या अनपेक्षित कलाटण्यांमुळे प्रेक्षकांच्या मनात या मालिकेविषयी विलक्षण उत्कंठा निर्माण होते. या मालिकेतील या दोन प्रमुख व्यक्तिरेखांमुळे कथानकाला विलक्षण कलाटणी मिळत असून त्यामुळे प्रेक्षकांमध्ये मालिकेविषयी प्रचंड कुतुहल निर्माण झाले आहे.

आगामी भागांमध्ये अधिकच नाट्यपूर्ण प्रसंग घडणार आहेत. या मालिकेत सेहबान अझीमने यापूर्वी विविध रूपे घेतल्याचे आपण पाहिले आहे. आता या अभिनेत्याने मालिकेत एका महिलेची भूमिका रंगविण्याचे आव्हान स्वीकारले असून महिलेच्या वेशात तो निश्चितच आकर्षक दिसतो, हे मान्य करावेच लागेल.

आपल्या भूमिकेला अधिक अस्सल भासविण्यासाठी सेहबान आणि रीम शेख यांनी यापूर्वी विविध रंगभूषा केल्याचे प्रेक्षकांनी पाहिले आहे. रीमने यापूर्वी एका लहान मुलीची तसेच शीख व्यक्तीची भूमिका साकारली होती. पण आता चक्क एका स्त्रीची व्यक्तिरेखा साकारून सेहबानने तिच्याशी स्पर्धा चालविली आहे. या स्त्रीवेशात तो स्वत:ला अनारकली मावशी म्हणवून घेतो. स्त्रीवेशात वावरण्याच्या कल्पनेने सेहबान खूपच उत्सुक होता.

या अनुभवाविषयी सेहबान अझीम म्हणाला, “मी प्रथमच स्त्रीवेशात अभिनय करणार आहे. त्यामुळे साडी, ब्लाऊझ नेसणं आणि जोडीला मेक-अप, दागिने आणि विविध वस्तू सांभाळणं ही कामं करणार्‍्या तमाम महिलांना मी मनापासून अभिवादन करतो. रोज महिलेचा वेश परिधान करण्यात माझा बराच वेळ खर्च होतो. पण मला हा बदल खूपच आवडला आहे. प्रामाणिक राहणं ही अवघड गोष्ट आहे आणि या भूमिकेसाठी मी बरीच मेहनत घेतल्याने प्रेक्षकांना ती आवडेल,  अशी मी आशा करतो.”

Web Title: Sehban Azim dons a female avatar for the first time in Tujhse Hai Raabta