SEE PICS: बिकीनी लूकमध्ये वावगं काय ? - रुप दुर्गापाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2017 10:56 IST2017-05-25T05:26:49+5:302017-05-25T10:56:49+5:30

थायलंडमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत असतानाचे रुपचे हे बिकीनी फोटो सोशल मीडियावर चांगलेच हिट ठरत आहेत. या फोटोंबाबत माध्यमांच्या प्रतिनिधींनी तिला छेडलं. यावेळी रुप दुर्गापाल हिनं बेधडक पद्धतीने उत्तर दिलं.

SEE PICS: What do you mean in a bikini look? - Roop Durgapal | SEE PICS: बिकीनी लूकमध्ये वावगं काय ? - रुप दुर्गापाल

SEE PICS: बिकीनी लूकमध्ये वावगं काय ? - रुप दुर्गापाल

'
;बालिका वधू' आणि गंगा अशा मालिकांमध्ये विशेष भूमिका साकारणारी अभिनेत्री रुप दुर्गापाल. तिच्या अभियनाने तिनं रसिकांची मनं जिंकली आहेत. मात्र नुकतंच रुप दुर्गापाल हिचा बेधडक, हजरजबाबी आणि आणि बिनधास्त अंदाज पाहायला मिळाला. रुप दुर्गापाल हिनं काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर आपले बिकीनी फोटो शेअर केले होते. थायलंडमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत असतानाचे रुपचे हे बिकीनी फोटो सोशल मीडियावर चांगलेच हिट ठरत आहेत. या फोटोंबाबत माध्यमांच्या प्रतिनिधींनी तिला छेडलं. यावेळी रुप दुर्गापाल हिनं बेधडक पद्धतीने उत्तर दिलं. मला बिकीनी घालण्याचा किंवा शो ऑफ करण्याचा अधिकार नाही का असा उलट सवाल तिनं यावेळी उपस्थित केला. एखादा अभिनेता त्याचे एब्ज दाखवतो ते चालतात मग अभिनेत्रीनं तिची बिकीनी बॉडी दाखवली तर त्यात गैर काय असा सवाल तिने यावेळी उपस्थित केला. रुप दुर्गापालवरील प्रश्नांची सरबत्ती बिकीनी पुरती मर्यादित नव्हती. यानंतर तिच्या लग्नाचा विषयही छेडण्यात आला. रुपने लग्न केलं होतं. मात्र त्याची कुठेही वाच्यता केली नव्हती. हाच धागा पकडून तिला प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचेही तिनं पहिल्या प्रश्नाप्रमाणेच बिनधास्त आणि बेधडक उत्तर दिलं. विवाहित अभिनेत्रींना कामं मिळत नाही समज चुकीचा असल्याचे तिने यावेळी नमूद गेले. ते दिवस सरले असल्याची आठवण तिनं यावेळी करुन दिली. याच कारणामुळे आपण लग्नाची गोष्ट लपवली असं वाटत असेल तर ते चुकीचं आहे असंही तिने स्पष्ट केलं. विवाहित असल्याचे सांगितल्यानंतर त्याचे काही तोटे असल्याचे तिने यावेळी नमूद केलं. विवाहित असल्याचं समजल्यानंतर त्या महिलेच्या वैवाहिक आयुष्यातील गोष्टी उखरुन काढण्याचा प्रयत्न केला जातो. वैयक्तीक आयुष्यावर कमेंट केली जाते, कोस्टारसह लिंकअप-अफेअरच्या चर्चा रंगवल्या जातात. या गोष्टी धोकादायक ठरु शकतात असं रुपला वाटतं. वैवाहिक जीवन, मुलं आणि इतर गोष्टी जाणून घेण्याचाही प्रयत्न केला जातो. मात्र आपल्याला केवळ आपलं काम बोलावं आणि इतर कोणत्याही गोष्टीची चर्चा होऊ नये असं वाटत होतं. त्यामुळेच लग्नाची गोष्ट गुपित ठेवल्याची कबूली तिनं दिली. जून 2016 मध्ये एका स्पोर्टस चॅनेलचे क्रिएटिव्ह डायरेक्टर असलेल्या दीपक नेलवालशी रुपनं कुणालाही कानोकान माहिती न देता गुपचूप लग्न केलं होतं. मात्र एका मुलाखतीत आपलं लग्न सिक्रेट नसून अरेंज मॅरेज असल्याची कबुली रुपने दिली होती.बालिका वधू, गंगा, बालवीर, स्वरागिनी, कुछ रंग प्यार के ऐसे भी या मालिकेत झळकलेली रुप दुर्गापाल लवकरच वारिस या मालिकेत पाहायला मिळणार आहे. 

 
 

Web Title: SEE PICS: What do you mean in a bikini look? - Roop Durgapal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.