'इश्क में मरजावा' मालिकेतील रहस्य कुलु मनाली येथे उलगडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2018 15:42 IST2018-02-01T10:12:54+5:302018-02-01T15:42:54+5:30

अॅक्शन, नाट्य, सूड, रोमान्स- कलर्सच्या इश्क मेंमरजावा मध्ये या सर्वांचे उत्कृष्ट मिश्रण आहे. अर्जुन बिजलानी (दीप) आणि अलिशा पंवार ...

The secret of 'Ishq Mein Marzawa' series will be revealed in Kulu Manali | 'इश्क में मरजावा' मालिकेतील रहस्य कुलु मनाली येथे उलगडणार

'इश्क में मरजावा' मालिकेतील रहस्य कुलु मनाली येथे उलगडणार

क्शन, नाट्य, सूड, रोमान्स- कलर्सच्या इश्क मेंमरजावा मध्ये या सर्वांचे उत्कृष्ट मिश्रण आहे. अर्जुन बिजलानी (दीप) आणि अलिशा पंवार (आरोही) यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा शो आता त्यातील मनोरंजन अजूनच उंचावणार आहे कारण त्यातील कलाकार आणि कर्मचारी शोच्या काही निर्णायक महत्वाच्या चित्रीकरणासाठी निसर्गरम्य हिलस्टेशन कुलु मनाली येथे जाणार आहेत.नुकतीच आरोही तुरूंगातून निसटली आहे तिचा स्वतःचा सूड घेण्यासाठी. तिची भाबी आणि भाचा निक्कू यांचा शोध घेण्याची आरोहीची इच्छा असते आणि त्यासाठी ती तारा बनून दीप सोबत मनालीला जायचे ठरविते; तिचा विश्वास असतो की ताराचा भाऊ विराट कडून त्यांना शोधण्याच्या बाबतीत काहीतरी सुराग नक्कीच मिळेल. याविषयी बोलताना,अर्जुन बिजलानी म्हणाले, “मनाली मध्ये चित्रीकरण करण्याचा हा सर्वात चांगला कालावधी आहे कारण येथे आता बर्फ पडत आहे आणि हे शहर अतिशय देखणे दिसत आहे. काही जोरदार सीनच्या चित्रीकरणासाठी आमचे येथील वेळापत्रक घाईगडबडीचे आहे, ते सीन पाहताना प्रेक्षकांसाठी क्लिफहँगर असणार आहेत, येथे खूप गोष्टी उघड होणार आहेत आणि आम्हाला आशा आहे की शोवरील रहस्य उलगडताना पाहण्याचा प्रेक्षक आनंद घेतील.” अलिशा पंवार पुढे म्हणाल्या, “मी एका पर्वतीय प्रदेशातील असल्यामुळे मला उत्तरेतील नंतरचा हिवाळा खूप आवडतो.चित्रीकरणाच्या या ठिकाणी जाण्यासाठी मी अतिशय उत्सुक आहे माझ्या वैयक्तिक दृष्टीने आणि अर्थातच माझ्या पात्राच्याआरोहीच्या दृष्टीने सुध्दा. जीवन वर्तुळाकार असते यावर माझा विश्वास आहे आणि आरोही साठी हे ते पर्वत आहेत जेथे ती दीपच्या प्रेमात प्रथम पडली होती, त्यामुळे तिच्या साठी हे नाटक या पर्वतांमध्येच संपविणे चांगले आहे.”कलाकार 1 फेब्रुवारी 2018 रोजी कुलु मनाली येथे जायला निघणार आहेत.विश्वासघात आणि फसवणूकीची गुंफण असलेली प्रेमकथा- कलर्सचा इश्क में मरजावा मध्ये आता अजून एका नव्या पात्राचा प्रवेश पहायला मिळणार आहे,जो याच्या लक्षवेधक कथेमध्ये प्रमुख भूमिका करणार आहे.निष्णात अभिनेत्री सुचेता त्रिवेदी ज्या गोड स्वभावासाठी आणि परिपक्व भूमिकांसाठी प्रसिध्द आहेत.आता या सर्वसमाविष्ट सूड कथेत सामील होणार आहेत एका सभ्य आणि सुसंस्कृत सोशल वर्कर-रोमाच्या भूमिकेत सुचेता पाहायला मिळणार आहे.

Web Title: The secret of 'Ishq Mein Marzawa' series will be revealed in Kulu Manali