सायली संजीव महालक्ष्मीच्या चरणी नतमस्तक, खरेदी केली कोल्हापुरी चप्पल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 11:22 IST2025-11-09T11:20:35+5:302025-11-09T11:22:39+5:30
सायली संजीवने करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीच्या चरणी नतमस्तक होत मनोभावे दर्शन घेतले.

सायली संजीव महालक्ष्मीच्या चरणी नतमस्तक, खरेदी केली कोल्हापुरी चप्पल
Sayali Sanjeev Mahalaxmi Darshan: मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात लाडक्या आणि लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत अग्रक्रमाने नाव घेतले जाते ते म्हणजे सायली संजीव हिचे. आपल्या मनमोहक सौंदर्याने, साधेपणाने आणि दमदार अभिनयाच्या जोरावर सायलीने प्रेक्षकांच्या मनात एक खास स्थान निर्माण केले आहे. तिची प्रत्येक भूमिका प्रेक्षकांना खूप भावते आणि त्यामुळेच तिच्या वैयक्तिक आयुष्यातील प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. नुकताच सायलीने महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात जाऊन देवीचे मनोभावे दर्शन घेतले आहे.
महालक्ष्मीच्या दर्शनासाठी दररोज राज्यभरातून आणि परराज्यातून हजारो भाविक येत असतात. सायलीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर मंदिरात दर्शनासाठी गेली असतानाचे काही खास फोटो केले आहेत. फोटोसोबत कॅप्शनमध्ये तिनं लिहलं, "श्री करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी... हे अंबाबाई तुझी अशीच कृपा राहू दे... जगदंब जगदंब जगदंब". यावेळी सायली खूप सुंदर दिसत होती. तिनं गडद निळ्या रंगाची पैठणी नेसली होती. केसात गजरा माळल्यानं तिच्या सौंदर्यांत आणखी भर पडली. चाहत्यांनी तिच्या फोटोंवर भरभरुन प्रेमाचा वर्षाव केलाय.
कोल्हापुरी चप्पल खरेदीची हौस
कोल्हापुरी चप्पल ही नेहमीच भल्या भल्यांच्या आकर्षणाचा विषय असतो. त्यामुळे कुणीही कोल्हापुरात आलं की आवर्जून कोल्हापुरी चप्पल खरेदी करतं. सायली संजीवलाही कोल्हापुरी चप्पल खरेदी करण्याचा मोह आवरता आला नाही. देवीच्या दर्शनानंतर सायली संजीवने कोल्हापूरची खास आणि जगभर प्रसिद्ध असलेली कोल्हापुरी चप्पल खरेदी करण्याची हौस पूर्ण केली. सायलीने शहरातील एका प्रसिद्ध चप्पल बाजारात जाऊन स्वतःसाठी खास कोल्हापुरी चप्पल खरेदी (Sayali Sanjeev Bought Kolhapuri Slippers) केली. तिने चप्पल खरेदी करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. कोल्हापुरी चप्पल खरेदी करतानाचा तिचा उत्साह चाहत्यांना खूप आवडला आहे.