'सावळ्याची जणू सावली'मधील सावली उर्फ प्राप्ती रेडकरने सांगितली दिवाळीची आठवण, म्हणाली - "दरवर्षी पहाटे..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 18:39 IST2025-10-18T18:39:26+5:302025-10-18T18:39:58+5:30
'Savalayanchi Janu Savali' fame Prapti Redkar : कलाकार मंडळी देखील त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून कुटुंबासोबत दिवाळी साजरी करण्याची योजना आखत आहेत. याच निमित्ताने अभिनेत्री प्राप्ती रेडकरने दिवाळीच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

'सावळ्याची जणू सावली'मधील सावली उर्फ प्राप्ती रेडकरने सांगितली दिवाळीची आठवण, म्हणाली - "दरवर्षी पहाटे..."
सण म्हणजे आपलेपणाचा, प्रेमाचा आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा एक आनंददायी अनुभव असतो. दिवाळी ही अशीच एक सुवर्णसंधी आहे जी आपल्याला आप्तेष्ट, सखेसोबती आणि भावंडांबरोबर एकत्र येऊन जुन्या आठवणी जागवण्याची संधी देते. कलाकार मंडळी देखील त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून कुटुंबासोबत दिवाळी साजरी करण्याची योजना आखत आहेत. याच निमित्ताने अभिनेत्री प्राप्ती रेडकरने दिवाळीच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
'सावळ्याची जणू सावली' या मालिकेतील 'सावली'ची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्राप्ती रेडकर तिच्या दिवाळीच्या आठवणी सांगताना म्हणाली, "जर मला सुट्टी मिळाली, तर मी माझ्या आई-वडिलांबरोबर दिवाळी साजरी करेन. माझ्या लहानपणीची एक खास आठवण म्हणजे, माझ्या नानीच्या घरी आम्हा लहान मुलांमध्ये दरवर्षी पहाटे ४ वाजता कोण पहिला फटाका वाजवतो, याची चढाओढ असायची."
प्राप्ती पुढे म्हणाली, "आई-वडिलांनी आणलेले नवीन कपडे घालून मरीन लाइन्सला जाणं, हे माझ्यासाठी खूप जिव्हाळ्याचं आहे. गेल्या ५ वर्षांपासून मी फटाके फोडणं थांबवलं आहे, कारण वायूप्रदूषण खूप होतं. माझ्या छोट्याशा कृतीने निसर्ग वाचत असेल, तर मी ते का करू नये? मात्र दिवाळी साजरी करण्याचे विविध मार्ग आहेत. मी कुटुंबासोबत फराळ करणे, नातेवाईकांना भेटणे आणि फराळ बनवण्याच्या प्रक्रियेत सहभागी होणे हा माझ्यासाठी दिवाळीचा एक खास भाग आहे." आपल्या व्यक्तिमत्त्वाची तुलना फटाक्यांशी करताना प्राप्ती हसत म्हणाली, "माझं व्यक्तिमत्व फुलबाजी आणि चक्रीसारखं आहे. फुलबाजीसारखं 'तडतड' करत मी सेटवर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सतत फिरत असते."