शिल्पा शिंदेनंतर 'अनिता भाभी'ही मालिकेत परतणार? 'धुरंधर' फेम सौम्या टंडन म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 12:33 IST2025-12-31T12:32:38+5:302025-12-31T12:33:21+5:30
'भाभीजी घर पर है'मध्ये परतली अंगुरी भाभी, आता अनिता भाभीही येणार?

शिल्पा शिंदेनंतर 'अनिता भाभी'ही मालिकेत परतणार? 'धुरंधर' फेम सौम्या टंडन म्हणाली...
टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय मालिका 'भाभीजी घर पर है' पुन्हा सुरु होत आहे. मालिकेत आता ओरिजनल अंगुरी भाभी शिल्पा शिंदे कमबॅक करत आहे. शिल्पाने मालिका सुरु झाली तेव्हा एक वर्ष अंगुरी भाभीची भूमिका केली. नंतर तिने अचानक मालिका सोडली आणि अभिनेत्री शुभांगी अत्रेने तिची जागा घेतली. पण आता शिल्पाने सगळे वाद विसरुन मालिकेच्या दुसऱ्या भागात कमबॅक केलं आहे. तसंच मालिकेत अनीता भाभीची भूमिकाही खूप गाजली. अभिनेत्री सौम्या टंडनने ती भूमिका साकारली होती. शिल्पासोबतच आता सौम्याही कमबॅक करणार अशी चर्चा सुरु झाली. त्यावर आता सौम्याने उत्तर दिलं आहे.
'झूम'शी बोलताना सौम्या टंडन म्हणाली, "नाही, मी मालिकेत परत येत नाहीये. मी दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये व्यग्र आहे. सध्या मी अन्य गोष्टींसोबत पुढे गेले आहे त्यामुळे आता मालिकेत परत येणं शक्यच नाहीये." सौम्या गेल्यानंतर तिच्या जागी नेहा पेंडसे अनिता भाभीच्या भूमिकेत आली. मात्र तिनेही काही काळाने शो सोडला. यानंतर अभिनेत्री विदिशा श्रीवास्तवने भूमिका साकारली.
सौम्याने २०२० साली 'भाभीजी घर पर है' मालिकेतून निरोप घेतला होता. सौम्याला करिअरमध्ये पुढे जायचं होतं. नुकतीच ती सुपरहिट 'धुरंधर' सिनेमात दिसली. यामध्ये तिने रहमान डकैतच्या म्हणजेच अक्षय खन्नाच्या बायकोची भूमिका साकारली होती.
सौम्या टंडनचं सध्या नशीब जोरावर आहे. 'धुरंधर' सिनेमा तुफान गाजतोय आणि यात तिच्या भूमिकेचीही चर्चा झाली. आता दुसऱ्या भागाबद्दल ती म्हणाली, "पार्ट २ मध्ये माझी फारशी मोठी भूमिका नाही. कारण माझ्या पतीचं तर निधन झालं आहे. मी दुसऱ्या पार्टमध्ये आहे हे नक्की पण माझे जास्त सीन्स नाहीत. मी आधीही सांगितलं होतं की माझा छोटासा भाग असेल. पण मला खूप प्रेम मिळालं आणि याचा परिणाम कायम राहिला ज्याची मी आशाही केली नव्हती."