'सातव्या मुलीची..'फेम पद्मजा आजीला ओळखलं का? पती अन् लेकही आहे प्रसिद्ध मराठी कलाकार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2023 11:23 AM2023-07-16T11:23:28+5:302023-07-16T11:24:07+5:30

Rajani welankar: ही भूमिका अभिनेत्री रजनी वेलणकर साकारत असून आजवर त्यांनी अनेक गाजलेल्या नाटक, सिनेमा आणि मालिकांमध्ये काम केलं आहे.

satyvya mulichi satvi mulgi actress rajani welankar latest news | 'सातव्या मुलीची..'फेम पद्मजा आजीला ओळखलं का? पती अन् लेकही आहे प्रसिद्ध मराठी कलाकार

'सातव्या मुलीची..'फेम पद्मजा आजीला ओळखलं का? पती अन् लेकही आहे प्रसिद्ध मराठी कलाकार

googlenewsNext

छोट्या पडद्यावर सध्या गाजत असलेली मालिका म्हणजे सातव्या मुलीची सातवी मुलगी.  गूढ कथानक असलेली ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाली. नुकतंच या मालिकेत नेत्रा आणि अद्वैत यांचं लग्न पार पडलं. त्यामुळे या मालिकेत पुन्हा एक नवा ट्विस्ट येणार आहे. विशेष म्हणजे दररोज येणाऱ्या नवनवीन वळणांमुळे ही मालिका आणि त्यातील कलाकार लोकप्रिय होत आहेत. यामध्येच सध्या मालिकेतील पद्मजा आजीची चर्चा रंगली आहे.

या मालिकेतील पद्मजा आजी यांना प्रेक्षकांकडून विशेष पसंती मिळत आहे. ही भूमिका अभिनेत्री रजनी वेलणकर साकारत असून आजवर त्यांनी अनेक गाजलेल्या नाटक, सिनेमा आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. इतकंच नाही तर त्यांचे पती आणि लेकसुद्धा प्रसिद्ध मराठी कलाकार आहेत.

रजनी या कॉलेजमध्ये असल्यापासून नाटकांमध्ये काम करतात. विशेष म्हणजे कॉलेजच्या सेकंड इअरला असताना त्यांचं लग्न ठरलं. मात्र, सासरच्या कुटुंबाचा पाठिंबा असल्यामुळे त्या घर आणि करिअर यांची गाडी व्यवस्थित सांभाळू शकल्या. रजनी वेलणकर या अभिनेता प्रदीप वेलणकर यांच्या पत्नी असून मधुरा वेलणकर हिच्या आई आहेत. 

दरम्यान, रजनी यांनी मधुचंद्राची रात्र, त्रिभंग, चौकट राजा, बिनधास्त अशा गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. सध्या त्या सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत काम करत आहेत. त्यांच्यासोबत तीतीक्षा तावडे, अजिंक्य ननावरे, ऐश्वर्या नारकर, मुग्धा गोडबोले, राहुल मेहेंदळे, अजिंक्य जोशी, अमृता रावराणे ही कलाकार मंडळी झळकली आहेत.
 

Web Title: satyvya mulichi satvi mulgi actress rajani welankar latest news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.