टीव्हीच्या प्रसिद्ध अभिनेत्रीने दिला बाळाला जन्म, बाळासोबतचा पहिला फोटो केला शेअर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 06:19 PM2021-06-29T18:19:41+5:302021-06-29T18:21:43+5:30

ज्योत्स्ना चांडोलाने प्रेग्नंसी खूप एन्जॉय केली.प्रेग्नंसीकाळात फिट राहण्यासाठी तिने पूर्ण काळजी घेतली. या दरम्यान तिने बर्‍यापैकी योगा, वर्कआउटही केले, वर्कआऊट करतानाचे फोटोही तिने चाहत्यांसह शेअर केले होते.

'Sasural Simar Ka' actress Jyotsna Chandola blessed with a baby boy, names him 'Joni' | टीव्हीच्या प्रसिद्ध अभिनेत्रीने दिला बाळाला जन्म, बाळासोबतचा पहिला फोटो केला शेअर

टीव्हीच्या प्रसिद्ध अभिनेत्रीने दिला बाळाला जन्म, बाळासोबतचा पहिला फोटो केला शेअर

googlenewsNext

सुपरहिट 'ससुराल सिमर का' मालिकेतून अभिनेत्री ज्योत्स्ना चांडोला प्रकाशझोतात आली होती. याच मालिकेतून तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रीय असते. सोशल मीडियावर तिच्या फॉलोअर्सचीही संख्या अधिक आहे. मार्च महिन्यात ज्योत्स्नाने पहिल्यांदा सोशल मीडियावर चाहत्यांसह गुड न्युज शेअर केली होती. आता ज्योत्स्नाच्या कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. तिच्या जीवनात नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. २६ जूनला तिने गोंडस बाळाला जन्म दिला. ज्योत्स्नाने मुलासोबत पहिला फोटो चाहत्यांसह शेअर करत ही खूशखबर तिच्या फॅन्सना दिली आहे. 

 

फोटो शेअर करताच चाहतेही शुभेच्छांचा वर्षाव करत आहे. 2015 मध्ये ज्योत्स्नाने अभिनेता नितेश सिंहशी लग्न केले होते. लग्नाच्या सहा वर्षानंतर दोघांच्या आयुष्यात बाळाचे आगमन झाले आहे. ज्योत्स्नाने मुलाचे नाव जोनी ठेवले आहे. मुलाच्या नावातही एक खास वैशिष्ट्य आहे. ज्योत्स्ना आणि निलेश यांच्या नावाचे पहिले अक्षर जुळवून मुलाचे नाव ठेवले आहे. 

 ज्योत्स्नाने प्रेग्नंसी खूप एन्जॉय केली.प्रेग्नंसीकाळात फिट राहण्यासाठी तिने पूर्ण काळजी घेतली. या दरम्यान तिने बर्‍यापैकी योगा, वर्कआउटही केले, वर्कआऊट करतानाचे फोटोही तिने चाहत्यांसह शेअर केले होते. ज्योत्सनाने 'मुस्कान', 'अग्निफेरा', 'संतोषी माँ', 'जोधा अकबर' ' मिसेस कौशिक की पांच बहुए' यासारख्या मालिकेत झळकली आहे.मात्र तिला 'ससुराल सिमर का' मालिकेतून सर्वात जास्त लोकप्रियता मिळाली. या मालिकेत तिने खुशी नावाची भूमिका साकारली होती. 

Web Title: 'Sasural Simar Ka' actress Jyotsna Chandola blessed with a baby boy, names him 'Joni'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.