'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स'फेम रोहित राऊतचं अभिनयात पदार्पण; चाहते म्हणाले....

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2023 16:47 IST2023-08-11T16:35:02+5:302023-08-11T16:47:13+5:30

आपल्या आवाजाच्या जोरावर अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या रोहितने आता अभिनयाच्या जगात पदार्पण केलं आहे.

saregamapa little champs fame singer rohit raut in marathi serial 36 guni jodi | 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स'फेम रोहित राऊतचं अभिनयात पदार्पण; चाहते म्हणाले....

'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स'फेम रोहित राऊतचं अभिनयात पदार्पण; चाहते म्हणाले....

 ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प’ या स्पर्धेमुळे घराघरात पोहोचलेला लोकप्रिय गायक म्हणजे रोहित राऊत. आपल्या आवाजाच्या जोरावर रोहितने अल्पावधीत लोकप्रियता मिळवली.  त्यामुळे सोशल मीडियावर त्याची कायम चर्चा रंगत असते.  आता त्याने अभिनयात सुद्धा एंट्री केली आहे.  

रोहित जितका कलाविश्वात सक्रीय आहे तितकाच सोशल मीडियावरदेखील आहे. त्यामुळे प्रोफेशनलसह तो पर्सनल आयुष्यातील गोष्टीही चाहत्यांसोबत शेअर करत असतो. रोहितने त्याच्या इन्स्टाग्राम काऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्याने शेअर केलेल्या व्हिडीओत  झी मराठीवरील '36 गुणी जोडी’ वेदांत आणि अमूल्या दिसतेय. 

‘प्रत्येक जोडी जुळत नसते’ असं म्हणत सुरु झालेली '३६ गुणी जोडी' ही मालिका प्रेक्षकांचे विशेषतः तरुणाईचं लक्ष वेधून घेणारी ठरत असून मालिका आता एका रोमांचक वळणावर आली आहे. वेदांत ऑफिस पिकनिक साठी नकार देत असतानाच आता ह्या मालिकेत एक नवीन ट्विस्ट येणार आहे कारण '३६ गुणी जोडी' मध्ये एका नवीन पात्राची एन्ट्री होणार आहे, त्यांच नाव आहे 'अमर्त्य'.

'अमर्त्य'ची भूमिका सा रे ग म प लिटिल चॅम्प फेम गायक रोहित राऊत, आता वेदांताचा बेस्ट फ्रेंड म्हणवणारा हा अमर्त्य नेमका कोण, तो वेदांत आणि अमूल्यच्या नात्यात अंतर निर्माण करेल ? अमर्त्यला अमुल्याच्या जवळ येताना पाहून वेदांत जेलस होईल? हे आपल्याला येणाऱ्या भागात कळणार आहे. रोहितचे चाहते त्याला मालिकेत पाहण्यासाठी उत्सुक आहेत. बघायला मजा येणार, खूपच उत्सुक आहे तुला स्क्रिनवर पाहायला अशा कमेंट्स त्याच्या पोस्टवर आल्या आहेत. 

रोहित तर तरूणाईच्या गळ्यातील ताईत आहे. रोहित देखील सोशल मीडियावर सक्रिय असतो. गेल्या वर्षीच रोहितने गायिका जुईली जोगळेकर सोबत लग्नगाठ बांधली होती.  जुईली देखील उत्तम गायिका आहे. दोघेही रिअलिटी शोमध्ये गाताना दिसतात.

Web Title: saregamapa little champs fame singer rohit raut in marathi serial 36 guni jodi