​साराभाई व्हर्सेस साराभाईच्या नव्या सिझनमध्ये प्रेक्षकांना 'या' गोष्टी पाहायला मिळणार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2017 10:04 IST2017-04-05T04:34:14+5:302017-04-05T10:04:14+5:30

साराभाई व्हर्सेस साराभाई या मालिकेची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. ही मालिका आता टीव्हीवर नव्हे तर वेबसिरिजच्या रूपात प्रेक्षकांना ...

Sarabhai Varesh Sarabhai's new season will see the audience 'these things' ... | ​साराभाई व्हर्सेस साराभाईच्या नव्या सिझनमध्ये प्रेक्षकांना 'या' गोष्टी पाहायला मिळणार...

​साराभाई व्हर्सेस साराभाईच्या नव्या सिझनमध्ये प्रेक्षकांना 'या' गोष्टी पाहायला मिळणार...

राभाई व्हर्सेस साराभाई या मालिकेची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. ही मालिका आता टीव्हीवर नव्हे तर वेबसिरिजच्या रूपात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. पहिल्या सिझनप्रमाणेच सतिश शहा, रत्ना पाठक शहा, रूपाली गांगुली, सुमीत राघवन, राजेश कुमार आणि देवेन भोजानी हे या मालिकेचा भाग असणार आहेतच. पण या सिझनमध्ये यासोबतच अनेक नवीन कलाकार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. या मालिकेच्या टीमने नुकताच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्सशी संवाद साधला. यावेळी प्रेक्षकांना या मालिकेचा नवा सेटदेखील पाहायला मिळाला. तसेच गप्पा मारताना सतिश, रत्ना, रूपाली, सुमीत, देवेन सगळेच आपल्या व्यक्तिरेखेच्या वेशभूषेत होते. त्यामुळे त्यांचा लूकदेखील प्रेक्षकांना कळला. या मालिकेचे दिग्दर्शक जे.डी.मजेठिया यांनीदेखील फॅन्ससोबत यावेळी खूप साऱ्या गप्पा मारल्या. यावेळी प्रेक्षकांना या सिझनविषयी अनेक नव्या गोष्टी सांगण्यात आल्या. ही मालिका आता काही वर्षांचा लीप घेणार असून साहिल आणि मोनिषा यांना एक मुलगा असल्याचे दाखवण्यात येणार आहे. या मुलामध्ये साहिल, मोनिषा आणि माया या तिघांचेदेखील गुण असणार आहेत. तसेच देवेननी पहिल्या सिझनमध्ये मायाच्या जावयाची व्यक्तिरेखा साकारली होती. या सिझनमध्येदेखील तो याच व्यक्तिरेखेत दिसणार असून त्याचा लूक पहिल्या सिझनपेक्षा खूपच वेगळा असणार आहे. 
साराभाई या मालिकेतील रोसेशच्या कविता तर खूपच गाजल्या होत्या. प्रेक्षकांना या सिझनमध्येदेखील त्याच्या विविध कविता ऐकायला मिळणार आहेत. पण त्याचसोबत या सिझनमध्ये आणखी काही मंडळीदेखील कविता लिहिणार आहेत. तसेच या मालिकेच्या लेखनात यावेळी स्वतः सतिश शहादेखील लक्ष घालत आहेत. या सगळ्यामुळे साराभाई व्हर्सेस साराभाई या मालिकेच्या पहिल्या सिझनपेक्षाही हा सिझन अधिक दमदार असणार यात काही शंकाच नाही. 

Web Title: Sarabhai Varesh Sarabhai's new season will see the audience 'these things' ...