संस्कारी बहूने तोडल्या सर्व मर्यादा, व्हिडीओ पाहून उंचावतील तुमच्याही भुवया

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2021 12:29 IST2021-08-20T12:27:56+5:302021-08-20T12:29:53+5:30

बिग बॉसमध्ये सहभागी होण्यासाठी तिने मालिका सोडली होती. साचेबद्ध कामात न अडकता नवीन काहीतरी करण्याच्या ती प्रयत्नात होती.

Sanskari Bahu Hina Khan Clean bowled everyone by her recent hot and bold video, goes viral | संस्कारी बहूने तोडल्या सर्व मर्यादा, व्हिडीओ पाहून उंचावतील तुमच्याही भुवया

संस्कारी बहूने तोडल्या सर्व मर्यादा, व्हिडीओ पाहून उंचावतील तुमच्याही भुवया

'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेतून घराघरात पोहचलेली हिना खान सध्या सोशल मीडियावर धुमाकुळ घालत आहे. ती प्रचंड सोशल मीडियावर सक्रीय असते. तिचे व्हिडीओ फोटो शेअर करत लक्ष वेधून घेत असते. एरव्ही मालिकेत सोज्वळ अंदाजात दिसणारी हिनाला अक्षरा म्हणून प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. आजही हिनाला अक्षरा म्हणून जास्त ओळखले जाते. बिग बॉसमध्ये सहभागी होण्यासाठी तिने मालिका सोडली होती. साचेबद्ध कामात न अडकता नवीन काहीतरी करण्याच्या ती प्रयत्नात होती. 

मालिका सोडल्यानंतर सोज्वळ अक्षरा बहू एकदम बोल्ड रुपात चाहत्यांच्या समोर आली. तिचा असा अंदाज पाहून चाहत्यांनीही आश्चर्यव्यक्त केले होते. अक्षरा ही इमेज तिला ब्रेक करायची होती म्हणून  रिएलिटी शोमध्ये झळकताना दिसली. बिग बॉसच्या आधी हिना खान 'खतरों के खिलाडी' सिझन 8 मध्ये झळकली होती. बिग बॉस ११ ची  हिना खान सर्वाधिक महागडी कंटेस्टंट होती.तिला एका आठवड्यासाठी 7 ते 8 लाख रुपये मानधन देण्यात आले होते. तिची लोकप्रियता इनकॅश करण्यासाठीच मेकर्सनेही तिला बिग बॉसची ऑफर दिली होती.

सध्या हिना खान सोशल मीडियावर धुमाकुळ घालत आहे. सोशल मीडियावरही तिचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. आपल्या अभिनयासोबतच अनोखी स्टाईल आणि सौंदर्यासाठी ती ओळखली जाते. चाहत्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी विविध गोष्टी करतानाचे व्हिडीओ ती शेअर करते. सोशल मीडियावर हिना  मेकअप आणि हेअर स्टाईलच्या टीप्सही देताना दिसते. कांन्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये हीनाच्या रेड कार्पेट लूकनंही सर्वांना आकर्षित केलं होतं.


गेले अनेक वर्षे ती चाहत्यांच्या हृद्यावर राज्य करतेय. तिच्या प्रत्येक व्हिडीओ आणि फोटोलाही तितकीच पसंती मिळते. नुकताच शेअर केलेला व्हिडीओत तिचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे. यावेळी शेअर केलेला हा व्हिडीओ थोडा वेगळा आहे. ड्रेसिंग जितकी बोल्ड तितकेच कडक एक्सप्रेशन तिच्या चेहऱ्यावर उमटल्याचे पाहायला मिळतंय. हिनाचा हा नवीन व्हिडीओवर चाहते भरभरून लाईक्स देताना दिसत आहेत.
 

Web Title: Sanskari Bahu Hina Khan Clean bowled everyone by her recent hot and bold video, goes viral