पहिल्यांदा मुलीबाबत बोलली अभिनेत्री संजीदा शेख, म्हणाली, तीच माझ्या आयुष्याची सोबती..

By गीतांजली | Updated: November 3, 2020 18:28 IST2020-11-03T18:15:16+5:302020-11-03T18:28:49+5:30

आमिरने काही महिन्यांपूर्वी मुलीचा पहिला फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.

Sanjeeda shaikh talk about her dughter first time says she is my only companion | पहिल्यांदा मुलीबाबत बोलली अभिनेत्री संजीदा शेख, म्हणाली, तीच माझ्या आयुष्याची सोबती..

पहिल्यांदा मुलीबाबत बोलली अभिनेत्री संजीदा शेख, म्हणाली, तीच माझ्या आयुष्याची सोबती..

टीव्ही अभिनेत्री संजीदा शेख आणि आमिर अली यांचं लग्न मोडल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून आहे. दोघेही वेगवेगळे राहत आहेत पण आतापर्यंत संजीदा आणि आमिर दोघांनीही यामागील कारण सांगितलेले नाही. त्याचबरोबर आमिर आणि संजीदा सेरोगेसीच्या मदतीने पालक  झाले आहेत. आमिरने काही महिन्यांपूर्वी मुलीचा पहिला फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. आता संजीदा पहिल्यांदाच आपल्या मुलीबाबत बोलली आहे. 

पिंकविलाशी बोलताना संजीदा म्हणाली, 'माझ्या आयुष्यात आता फक्त माझी मुलगी माझी सोबती आहे.आता माझं आयुष्य खूप छान आहे. मला हे साधं सोपं ठेवायचं आहे. मी पहिल्यांदा आई झाले आहे आणि मला असे वाटते की, याहुन कोणतचा चांगला अनुभव असू शकत नाही. 

पतीपासून विभक्त झाल्यानंतर आईसोबत राहण्यावर संजीदा म्हणाली, "मी आईबरोबर राहत आहे आणि जेव्हा तुमच्यासोबत तुमची आई असेत तेव्हा ते आशीर्वादा पेक्षा कमी नसते."

संजीदा पुढे तिच्या करिअरबद्दल म्हणाली, 'मी स्वत: ला करिअरमध्ये पुढे जाताना पाहते आहे. मला छान वाटतेय. मी माझ्या आयुष्यातील या पैलूचा खूप आनंद घेत आहे. 

संजीदा शेखने 'क्या होगा निम्मो का' या मालिकेद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. ती आज अनेक वर्षं छोट्या पडद्यावर काम करत आहे. ती गेल्या काही वर्षांत 'जाने पहचाने से अजनबी', 'एक हसिना थी' यांसारख्या अनेक मालिकांमध्ये झळकली आहे.
 

Web Title: Sanjeeda shaikh talk about her dughter first time says she is my only companion