संजय मोने दिसणार 'या' वेगळ्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2018 20:30 IST2018-11-22T20:30:00+5:302018-11-22T20:30:00+5:30

आजपर्यंत प्रेक्षकांनी संजय मोने यांना अनेक मालिकांतून वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहिलं आहे तसंच त्यांच्या कामावर प्रेमाचा वर्षाव देखील केला आहे. आता चाहते संजय मोने यांना वेगळ्या भूमिकेत पाहू शकतील.

Sanjay Mone will appear in a different role | संजय मोने दिसणार 'या' वेगळ्या भूमिकेत

संजय मोने दिसणार 'या' वेगळ्या भूमिकेत

ठळक मुद्दे सूत्रसंचालनाची धुरा जेष्ठ अभिनेता संजय मोने यांच्यावर सोपवण्यात आली आहेआता चाहते संजय मोने यांना वेगळ्या भूमिकेत पाहू शकतील

 झी मराठीच्या प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे लवकरच झी मराठीवर चला हवा येऊ द्या, आम्ही सारे खवय्ये आणि होम मिनिस्टर नंतर अजून २ नव्या कथाबाह्य कार्यक्रम सादर होणार आहेत. त्यातील एक कार्यक्रम हा चॅट शो असणार आहे. त्या कार्यक्रमाचं नाव 'कानाला खडा' असं आहे. या चॅट शो मध्ये कलाकारांशी गप्पा मारण्यासाठी आणि त्यांची टेर खेचण्यासाठी एखादं मिश्किल व्यक्तिमत्वच सूत्रसंचालकाच्या भूमिकेत असलं पाहिजे आणि म्हणूनच या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा जेष्ठ अभिनेता संजय मोने यांच्यावर सोपवण्यात आली आहे. आजपर्यंत प्रेक्षकांनी संजय मोने यांना अनेक मालिकांतून वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहिलं आहे तसंच त्यांच्या कामावर प्रेमाचा वर्षाव देखील केला आहे. आता चाहते संजय मोने यांना वेगळ्या भूमिकेत पाहू शकतील.  या कार्यक्रमाबद्दलची माहिती गुलदस्त्यात असली तरी ही प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी घेऊन येणार हा कार्यक्रम या महिन्याच्या अखेरीस सादर होणार आहेत हे मात्र नक्की.   

संजय मोने हे त्यांच्या नव्या भूमिकेबद्दल म्हणाले, "आजवर प्रेक्षकांनी माझी प्रत्येक भूमिका स्वीकारली आणि त्यांच्या प्रेमाने माझ्या कामाची पोचपावती देखील दिली. कलाकारांशी गप्पा मारायला मी सज्ज आहे. माझं आणि झी मराठीचं नातं खूप जुनं आहे आणि मी झी मराठीचा आभारी आहे की त्यांनी माझी या सूत्रसंचालकाच्या भूमिकेसाठी निवड केली."
 

Web Title: Sanjay Mone will appear in a different role