बिग बॉसमध्ये सहभागी होणार असल्याच्या अफवांचा अभिनेत्याला नाहक फटका, कामाच्या ऑफर्सही मिळेना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 10:25 AM2021-09-17T10:25:38+5:302021-09-17T10:31:20+5:30

महेश मांजरेकर यांचे सूत्रसंचालन, कार्यक्रमातील सदस्य, त्यांची भांडण, त्यांची दोस्ती - यारी, नॉमिनेशन प्रक्रिया, कॅप्टनसी, टास्क या सगळ्या गोष्टींनी प्रेक्षकांची मने जिंकली.

Sangram Samel not going to participate in bigg boss marathi 3 Due to Rumours Not Getting Work | बिग बॉसमध्ये सहभागी होणार असल्याच्या अफवांचा अभिनेत्याला नाहक फटका, कामाच्या ऑफर्सही मिळेना

बिग बॉसमध्ये सहभागी होणार असल्याच्या अफवांचा अभिनेत्याला नाहक फटका, कामाच्या ऑफर्सही मिळेना

googlenewsNext

जगभरात चर्चेत असणार, प्रत्येक पर्वामधून प्रेक्षकांना नवीन अनुभव देणारा, करोडो प्रेक्षकांचे अपार प्रेम मिळवलेला, संपूर्ण भारतामध्ये हुकुमत गाजवणारा कार्यक्रम म्हणजे “बिग बॉस”. बिग बॉस मराठीच्या दोन्ही पर्वांना अभूतपूर्व यश मिळाले आणि जेव्हा कार्यक्रमाचा नवा टिझर वाहिनीवर दिसला तेव्हापासून या कार्यक्रमबद्दलच्या बऱ्याच चर्चा पुन्हा एकदा प्रेक्षकांमध्ये सुरु झाल्या. मग तो बिगचा आवाज असो, बिग बॉसच्या घरातील छोट्या मोठ्या गोष्टी वा किस्से वा बिग बॉस मराठीचे घर असो.

 

महेश मांजरेकर यांचे सूत्रसंचालन, कार्यक्रमातील सदस्य, त्यांची भांडण, त्यांची दोस्ती - यारी, नॉमिनेशन प्रक्रिया, कॅप्टनसी, टास्क या सगळ्या गोष्टींनी प्रेक्षकांची मने जिंकली. आता हे  घर सज्ज आहे आपलं मनोरंजन करण्यासाठी. पुन्हा एकदा ते घर येत आहे संपूर्ण  महाराष्ट्रामध्ये एंटरटेनमेंट अनलॉक करायला १९ सप्टेंबरपासून बिगबॉस मराठीच्या तिसर्‍या पर्वाला सरुवात होणार आहे. या शोचेही सूत्रसंचालन महेश मांजरेकर करणार असून त्यांनी नुकतेच या कार्यक्रमाच्या प्रोमोचे शूट संपवले. 


छोट्या पडद्यावरील सर्वात वादग्रस्त शो बिग बॉस शो असल्यामुळे या सिझनमध्ये कोणते चेहरे झळकणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहेत. सोशल मीडियावर कलाकारांची नावांविषयी तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र सुरु असणा-या अफवांमुळे एका अभिनेत्याला चांगलाच फटका बसला आहे. हा अभिनेता आहे संग्रमा समेळ. संग्राम बिग बॉसमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चा इतक्या रंगल्या की, त्याला आता इतर शोच्या ऑफर्सही मिळत नाही.  

 

ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये तो सहभागी होणार नसल्याचे नसल्याचे त्याने स्पष्ट केलंय. पण या अफवांमुळे त्याला आता काम मिळत नसल्याची खंत व्यक्त करत आहेत. मुळात जेव्हा पासून या कार्यक्रमाची घोषणा झाली तेव्हा पासून सतत फोनद्वारे याबाबत विचारले जात आहेत. प्रत्येकाला या सगळ्या अफवाच असल्याचे सांगतोय. इतकंच काय तर  बिग बॉस मराठी ३ या शोमधला मी अंतीम स्पर्धकांच्या यादीमध्ये नावाचीही समावेशही करून टाकला आहे. या सगळ्या अफवांमध्ये नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे अभिनेत्याने खंत व्यक्त केली आहे. 


 संग्रामने नाटक, चित्रपट,मराठी मालिका यांमधून आपली एक खास ओळख निर्माण केली आहे.त्याची प्रचंड लोकप्रियता आहे. त्याच्या विविध भूमिका चाहत्यांच्या पसंतीस पात्र ठरल्या आहेत.एक उत्तम अभिनेता असल्यासोबत त्याची एक दुसरी ओळख म्हणजे संग्राम हा प्रसिद्ध लेखक, अभिनेता अशोक समेळ यांचा तो मुलगा आहे

Web Title: Sangram Samel not going to participate in bigg boss marathi 3 Due to Rumours Not Getting Work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.