संग्राम समेळ घेणार 'बापमाणूस'मधून एक्झिट आणि करणार 'ह्या' मालिकेत एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2018 22:00 IST2018-07-30T17:23:44+5:302018-07-30T22:00:00+5:30

संग्राम समेळ 'ललित २०५' या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 

Sangram Samel new serial Lalit 205 | संग्राम समेळ घेणार 'बापमाणूस'मधून एक्झिट आणि करणार 'ह्या' मालिकेत एन्ट्री

संग्राम समेळ घेणार 'बापमाणूस'मधून एक्झिट आणि करणार 'ह्या' मालिकेत एन्ट्री

ठळक मुद्दे'ललित २०५' ही कौटुंबिक मालिका आहे.ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

झी युवा वाहिनीवरील 'बापमाणूस' मालिकेत अभिनेता संग्राम समेळने हर्षवर्धन सबनीसची भूमिका साकारून घराघरात पोहचला. आता लवकरच या मालिकेतून एक्झिट घेणार आहे आणि स्टार प्रवाह वाहिनीवरील 'ललित २०५' या मालिकेत एन्ट्री करणार आहे. ललित २०५ या मालिकेत तो मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेची झलक त्याने सोशल मीडियावर शेअर केली आहे. 


याबाबत संग्राम समेळ म्हणाला की, '६ ऑगस्टला 'बापमाणूस' मालिकेत मी शेवटचा दिसणार आहे आणि त्याच दिवशी मी स्टार प्रवाह वाहिनीवर नव्याने दाखल होणाऱ्या 'ललित २०५' मालिकेत एन्ट्री करणार आहे. '
'ललित २०५' ही कौटुंबिक मालिका असून या मालिकेबद्दल संग्रामने सांगितले की, 'मात्र इतर कौटुंबिक मालिकांसारखी नाही. या मालिकेत आजी, काका-काकू अशी जॉइंट फॅमिलीची मजा यात पाहायला मिळणार आहे. साधारण  घरात साधारण गोष्टीवरून होणाऱ्या वाद, मजा व आनंदाचे क्षण यात पाहायला मिळणार आहे. या कुटुंबात मी आजीचा एकुलता एक नातूची भूमिका केली आहे. मी आतापर्यंत केलेल्या भूमिकेपेक्षा ही वेगळी भूमिका आहे. हा टिपिकल चॉकलेट बॉय नाही किंवा पूर्ण व्हिलन नाही. तो पूर्ण चांगला किंवा वाईट असाही नाही.'


सुहास जोशी यांच्यासोबतचा अनुभवाबद्दल सांगताना संग्राम म्हणाला की, 'सुहास मावशींसोबत मी आठवी किंवा नववी इयत्तेत असताना सह्याद्री वरील हे बंध रेशमाचे या मालिकेत काम केले होते. त्यानंतर मी आज इतक्या वर्षांनी त्यांच्यासोबत काम करतो आहे. त्यांच्याबरोबर काम करताना नेहमीच खूप शिकायला मिळते. त्यांचा चेहरा व डोळे बोलके आहेत. त्यामुळे काम करताना त्यांना बोलताना पाहून आपली वाक्य विसरून हरवून जायला होते. पहिल्या दिवशीच मी त्यांना सेटवर मला बारीकसारीक गोष्टी शिकवा, असे सांगितले. त्या खूप उत्तम कलाकार आहेत आणि खूप चांगल्या, मनमिळाऊ व्यक्ती आहेत. सर्वांसोबत मिळून मिसळून राहतात.'   


 

Web Title: Sangram Samel new serial Lalit 205