अजब प्रेमाची गजब गोष्ट ! मालिकेत लग्न करता आले नाही म्हणून खऱ्या आयुष्यात लग्नबंधनात अडकले होते 'हे' कपल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2019 13:26 IST2019-02-13T13:19:57+5:302019-02-13T13:26:46+5:30

दोघांची प्रेमकहाणीही तितकीच वेगळी आहे. गेले अनेक वर्षांपासून त्यांच्या प्रेमाचे  बंध अधिक घट्ट झालेत. पहिल्यांदाच संग्रामने आपल्या लेडी लव्ह खूशबु सह लग्न करण्याचे कारण सांगितले आहे.

Sangram Salvi And Khushboo Tawde Love Story | अजब प्रेमाची गजब गोष्ट ! मालिकेत लग्न करता आले नाही म्हणून खऱ्या आयुष्यात लग्नबंधनात अडकले होते 'हे' कपल

अजब प्रेमाची गजब गोष्ट ! मालिकेत लग्न करता आले नाही म्हणून खऱ्या आयुष्यात लग्नबंधनात अडकले होते 'हे' कपल

जीव दंगला, गुंगला, रंगला असा असं म्हणत सध्या प्रेमाचं सेलिब्रेशन सुरु आहे. मराठी सिनेसृष्टीतील गोड जोडी म्हणजे संग्राम साळवी आणि खुशबू तावडेही व्हॅलेटाईन डेचे सेलिब्रेशन करण्यात बिझी आहे. विषेष म्हणजे खुशबू आणि संग्राम यांचा लग्नानंतरचा हा पहिला व्हॅलेन्टाईन डे असल्यामुळे तो ख-या अर्थाने स्पेशल आहे. गेल्यावर्षी 5 मार्चला हे दोघे विवाहबंधनात अडकले होते. मोठ्या थाटात पारंपारीक विवाह पद्धतीने हा विवाहसोहळा संपन्न झाला होता. दोघांची प्रेमकहाणीही तितकीच वेगळी आहे. गेले अनेक वर्षांपासून त्यांच्या प्रेमाचे  बंध अधिक घट्ट झालेत. पहिल्यांदाच संग्रामने आपल्या लेडी लव्ह खूशबु सह लग्न करण्याचे कारण सांगितले आहे.

या व्हॅलेन्टाईन्स डे निमित्ताने खुशबू आणि संग्राम यांनी त्यांची लव्हस्टोरी चाहत्यांसोबत शेअर केली. संग्राम आणि खुशबू यांच्या मालिकांचे सेट आसपासच होता. त्यामुळे त्या दोघांची तोंडओळख होती पण खुशबूच्या मनात संग्रामबद्दची इमेज काही खास नव्हती. त्याला खूप ऍटिट्यूड आहे असं खुशबूला वाटायचं. त्यानंतर त्या दोघांनी एकत्र एका मालिकेत काम केलं. तेव्हा संग्रामबद्दल खुशबूचं मत बदललं आणि त्यांच्यात मैत्री झाली.

 

जर खुशबूचं लग्न मालिकेत संग्रामसोबत झालं नाही तर ती मालिका सोडेल अशी ताकीद खुशबूने मालिकेच्या निर्मात्यांना दिली होती आणि कथानकामधील काही बदलामुळे खरंच खुशबूचं लग्न संग्रामशी झालं नाही आणि खुशबूने ती मालिका सोडली. त्याक्षणी संग्रामने ठरवलं की मालिकेत नाही पण खऱ्या आयुष्यात तो खुशबूशीच लग्न करणार आणि त्याने खुशबूला लग्नाची मागणी घातली. संग्राम आणि खुशबूची लव्हस्टोरी देखील त्यांच्यासारखीच अनोखी आणि सुंदर आहे. सध्या 'सूर राहू दे' मालिकेत संग्राम साळवी भूमिका साकारत आहे तर 'आम्ही दोघी' मालिकेत खुशबू तावडे झळकत आहे.

Web Title: Sangram Salvi And Khushboo Tawde Love Story