'भाभीजी घर पर है' मालिकेतील तिवारीजींची भूमिका या अभिनेत्याला करण्यात आली होती ऑफर, पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2018 16:07 IST2018-11-01T16:06:22+5:302018-11-01T16:07:21+5:30

संदीप आनंद 'भाभीजी घर पर है' या मालिकेतील पुत्तन या लक्षवेधी आणि मनोरंजक व्यक्तिरेखेसाठी खूप प्रसिद्धी मिळालेला हा कलावंत येत्या दिवाळीमध्ये मालिकेत परत येत आहे.

Sandeep Anand Entry in Bhabiji Ghar Par Hain | 'भाभीजी घर पर है' मालिकेतील तिवारीजींची भूमिका या अभिनेत्याला करण्यात आली होती ऑफर, पण

'भाभीजी घर पर है' मालिकेतील तिवारीजींची भूमिका या अभिनेत्याला करण्यात आली होती ऑफर, पण

'मै आय कम इन मॅडम' मालिकेमुळे घराघरात पोचलेला अभिनेता संदीप आनंद घराघरात पोहचला. मालिकेत साकारलेली त्याच्या भूमिकेलाही रसिकांची पसंती मिळाली होती. त्याच्या कॉमेडीच्या भन्नाट आणि अचूक टायमिंगने रसिकांना अक्षरक्षा वेड लावलं. मै आय कम इन मॅडम मालिका बंद झाल्यानंतर आता तो पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर झळकणार आहे. 'भाभीजी घर पर है' या मालिकेतील पुत्तन या लक्षवेधी आणि मनोरंजक व्यक्तिरेखेसाठी खूप प्रसिद्धी मिळालेला हा कलावंत येत्या दिवाळीमध्ये मालिकेत परत येत आहे.

भाभीजी घर पर है या मालिकेला मिळत असलेले यश बघता, या मालिकेत परत येणे कोणत्याही अभिनेत्याला आवडेलच. अनेक विनोदी मालिकांमध्ये काम केल्यामुळे मी एक गोष्ट नक्कीच सांगू शकतो. कोणाला हलकाफुलका विनोद आवडत असेल, तर या मालिकेशी स्पर्धा करू शकेल अशी दुसरी कोणतीही मालिका नाही,” असे संदीप आनंद मालिकेतील त्याच्या कमबॅकबद्दल म्हणाला.

विनोदापेक्षा वेगळे काही करण्याची संधी देणाऱ्या भूमिकांबद्दल विचारले असता त्याने तिवारीजींच्या भूमिकेसाठी कशी विचारणा झाली होती ते सांगितले, “मला सुरुवातीला या मालिकेतील तिवारीजींच्या भूमिकेसाठी विचारणा झाली होती पण मी ती संधी जाऊ दिली, कारण या व्यक्तिरेखेला आणि भूमिकेच्या मागणीला मी योग्य न्याय देऊ शकणार नाही, असे मला वाटले. मला वाटते रोहिताश भाईंनी ही भूमिका उत्तम साकारली आहे.

त्याच्या मूळ व्यक्तिरेखेबद्दल तो म्हणाला, “मी या मालिकेसाठी केवळ तीन भागांचे शूटिंग केले होते पण क्रिएटिव्ह टीमने ही व्यक्तिरेखा उभी केली आणि या नावाला लोकप्रियता मिळवून दिली. मी साकारत नव्हतो त्या काळातही पुत्तन ही एक व्यक्तिरेखा म्हणून कायम राहिली आणि प्रेक्षकांना ती खूप आवडली आहे. मला माझे चाहते सारखे परत येण्यास सांगत होते आणि ही संधी पुन्हा एकदा मिळाल्याबद्दल मी खरचं आभारी आहे. गेल्या वर्षभरात मी या भूमिकेसाठी स्वत:ला बऱ्यापैकी बदलले आहे आणि प्रेक्षकांना ते लवकरच मालिकेमध्ये बघण्याची संधी मिळेल.”


 

Web Title: Sandeep Anand Entry in Bhabiji Ghar Par Hain