​बिन कुछ कहे मालिकेतील समीर अरोरा आणि शमता अांचनने केली जयपूरमध्ये मजा-मस्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2017 13:03 IST2017-02-08T07:33:23+5:302017-02-08T13:03:23+5:30

बिन कुछ कहे ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेद्वारे शमता आंचन दोन वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन ...

Sameer Arora and Shamta Achan made some surprises in the series | ​बिन कुछ कहे मालिकेतील समीर अरोरा आणि शमता अांचनने केली जयपूरमध्ये मजा-मस्ती

​बिन कुछ कहे मालिकेतील समीर अरोरा आणि शमता अांचनने केली जयपूरमध्ये मजा-मस्ती

न कुछ कहे ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेद्वारे शमता आंचन दोन वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहेत. शमताने एव्हरेस्ट या मालिकेत काम केले होते. तिने तिच्या पहिल्याच मालिकेद्वारे प्रेक्षकांचे मन जिंकले. तसेच या मालिकेत समीर अरोरा प्रमुख भूमिका साकारणार आहे. समीरची पहिलीच मालिका आहे. या मालिकेचे चित्रीकरण सध्या जयपूर येथे सुरू आहे. त्यामुळे या मालिकेची टीम चित्रीकरण करण्यासोबतच जयपूर शहर फिरत आहे. 
शमता आणि समीर यांनी जयपूरमधील विविध ठिकाणांना नुकत्याच भेटी दिल्या. त्याचसोबत तिथे मिळणाऱ्या पदार्थांवर त्यांनी ताव मारला. एवढेच नव्हे तर ते दोघे तिथे रिक्षानेदेखील फिरले. तसेच जयपूरमधील प्रसिद्ध बाजारात त्यांनी नुकतीच शॉपिंगदेखील केली. या मालिकेत शमता जयपूरमध्ये राहाणाऱ्या एका मुलीची व्यक्तिरेखा साकारत आहे. याविषयी शमता सांगते, "या मालिकेत मी मायरा कोहली ही भूमिका साकारत असून ती एक खूप चांगली मुलगी आहे. आईचा शब्द ती प्रमाण मानते. या मालिकेचे चित्रीकरण सुरू झाल्यापासून जयपूर हे शहर माझे दुसरे घरच बनले आहे. येथे मिळणाऱ्या प्रसिद्ध कचोरींचा मी नुकताच आस्वाद घेतला. चित्रीकरणातून वेळ काढून मी जयपूरमधील अनेक ठिकाणे पाहिली. पण अजूनही मला अनेक ठिकाणांना भेटी द्यायच्या आहेत. लवकरच संपूर्ण जयपूर फिरण्याचा माझा विचार आहे. 
बिन कुछ कहे या मालिकेत एका पंजाबी कुटुंबाची कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आपल्या पतीच्या निधनानंतर आपल्या तिन्ही मुलींचा सांभाळ एक स्त्री करते. या तिन्ही मुलींचा स्वभाव खूपच वेगळा आहे. पण या तिघींकडून त्यांच्या आईला खूप अपेक्षा आहेत. त्यातील सर्वात लहान मुलगी मायरा ही सगळ्यांची खूप लाडकी आहे. खऱ्या प्रेमाचा शोध घेत असलेल्या मायराची कथा मालिकेत दाखवली जाणार आहे. 

Web Title: Sameer Arora and Shamta Achan made some surprises in the series