"माझ्या आयुष्यातसुद्धा संभाजी महाराज कायम सोबत असतील", प्राजक्ता गायकवाड शंभुराजबद्दल म्हणाली असं काही...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 11:45 IST2025-08-09T11:45:10+5:302025-08-09T11:45:51+5:30
Prajakta Gaikwad : प्राजक्ता गायकवाडचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यात ती तिच्या अहो म्हणजेच शंभुराजबद्दल बोलताना दिसत आहे.

"माझ्या आयुष्यातसुद्धा संभाजी महाराज कायम सोबत असतील", प्राजक्ता गायकवाड शंभुराजबद्दल म्हणाली असं काही...
'स्वराज्य रक्षक संभाजी' (Swarajya Rakshak Sambhaji) मालिकेत येसूबाईंच्या भूमिकेतून अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड (Prajakta Gaikwad) हिला चांगलीच लोकप्रियता मिळाली. अभिनेत्रीने नुकतेच चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. नुकताच तिचा पुण्यात साखरपुडा पार पडला असून तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव शंभुराज खुटवड आहे. आता ती लवकरच पुण्यातील फुरसुंगीची सून होणार आहे. सध्या तिचे सोशल मीडियावर साखरपुड्याचे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. तिचा एक व्हिडीओही समोर आला आहे, ज्यात ती तिच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल बोलताना दिसत आहे.
प्राजक्ता गायकवाडचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यात ती तिच्या अहो म्हणजेच शंभुराजबद्दल बोलताना दिसत आहे. ती म्हणाली की, ''माझ्यासाठी सुद्धा हे सगळं खरंच खूप अनपेक्षित होतं. कारण संभाजी महाराज कायम हृदयात होते आणि आहेत आणि राहतील. तसेच मला वाटते की माझ्या आयुष्यातसुद्धा संभाजी महाराज कायम सोबत इथून पुढेही असतील... कारण आता जे होणारे अहो आहेत त्यांचं नावही महाराजांच्या अनुसरुन आहे.''
प्राजक्ता गायकवाड आणि शंभुराज खुटवड यांची पहिली भेट एका अपघातात झाली होती, जिथे शंभूराजने प्राजक्ताला मदत केली. हळूहळू मैत्री प्रेमात बदलली. सुरुवातीला प्राजक्ताने नकार दिला, पण शंभूराजने तिच्या क्षेत्राबद्दल जाणून घेतलं. रिल आणि रिअल लाइफमध्ये ती कशी आहे, हे पाहिल्यानंतर तिच्याशीच लग्न करायचं मनाशी पक्कं केलं. दोघांच्या घरच्यांच्या संमतीनंतर साखरपुडा ठरला. आता लवकरच ते लग्नगाठ बांधणार आहेत. याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.