सलमान खान करणार बिग बॉसच्या प्रोमोचे शूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2017 15:34 IST2017-07-27T10:04:39+5:302017-07-27T15:34:39+5:30
बिग बॉसचे सूत्रसंचालन गेल्या अनेक सिझनपासून सलमान खान करत आहे. प्रेक्षक सलमानशिवाय बिग बॉसचा विचार देखील करू शकत नाहीत. ...
.jpg)
सलमान खान करणार बिग बॉसच्या प्रोमोचे शूट
ब ग बॉसचे सूत्रसंचालन गेल्या अनेक सिझनपासून सलमान खान करत आहे. प्रेक्षक सलमानशिवाय बिग बॉसचा विचार देखील करू शकत नाहीत. पण सलमान बिग बॉस सोडणार असल्याच्या बातम्या कित्येक दिवसांपासून येत आहेत. सलमानऐवजी अक्षय कुमार या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार असल्याची चर्चा होती. पण सलमानच्या फॅन्ससाठी एक खूप चांगली बातमी आहे. अक्षय बिग बॉसचे सूत्रसंचालन करणार आहे ही केवळ अफवा होती. सलमानच बिग बॉस 11चे सूत्रसंचालन करणार असून तो या कार्यक्रमाच्या प्रोमोसाठी लवकरच चित्रीकरण करणार असल्याचे कळतेय.
गेल्या सिझनमध्ये प्रियांका जग्गा, ओम स्वामी यांसारखे स्पर्धक प्रेक्षकांना पाहायला मिळाले होते. हे स्पर्धक घरात इतरांशी अतिशय वाईट वागले होते. त्यांनी घरात अक्षरशः गोंधळ घातला होता. त्यामुळे यांसारख्या स्पर्धकांमुळे सलमान बिग बॉसपासून दूरच राहाणार असल्याचे म्हटले जात होते. पण डीएनए वर्तमानपत्राने दिलेल्या बातमीनुसार सलमान मोर्कोला त्याच्या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी गेला आहे. पण तो लवकरच भारतात बिग बॉसचे चित्रीकरण करायला येणार आहे. सलमान येत्या रविवारी बिग बॉसच्या प्रोमोचे चित्रीकरण करणार असून या प्रोमोच्या चित्रीकरणाची सध्या जय्यत तयारी सुरू असल्याचे वृत्त डीएनएने दिले आहे. या प्रोमामध्ये एक नवी थिम पाहायला मिळणार असून यंदा नोव्हेंबरमध्ये नव्हे तर ऑक्टोबरमध्येच हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.
बिग बॉसच्या या सिझनमध्ये देखील गेल्या सिझनप्रमाणे सामान्य लोकांना संधी देण्यात आली आहे. सामान्य लोकांसाठी ऑडिशन्स देखील घेतली जात आहेत. एवढेच नव्हे तर एकाच कुटुंबातील दोन-तीन सदस्य या सिझनमध्ये बिग बॉसच्या घरात एकत्र झळकणार असल्याची देखील चर्चा आहे.
Also Read : याप्रकारे तुम्ही सहभागी होऊ शकता बिग बॉसमध्ये