Bigg Boss 16 : सलमान खानला 1000 कोटी मानधन?; 'भाईजान' म्हणाला, एवढे पैसे मिळाले तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2022 12:19 PM2022-09-28T12:19:48+5:302022-09-28T12:23:16+5:30

Bigg Boss 16 : ‘बिग बॉस 16’ होस्ट करण्यासाठी सलमानने म्हणे 1000 कोटी वसूल केल्याचं म्हटलं जात आहे. आता खुद्द सलमानने यावर खुलासा केला आहे.

Salman Khan On Rumours Of Charging Rs 1,000 Crore For Bigg Boss 16 "If I Get This Amount, I Will..." | Bigg Boss 16 : सलमान खानला 1000 कोटी मानधन?; 'भाईजान' म्हणाला, एवढे पैसे मिळाले तर...

Bigg Boss 16 : सलमान खानला 1000 कोटी मानधन?; 'भाईजान' म्हणाला, एवढे पैसे मिळाले तर...

googlenewsNext

सलमान खान ( Salman Khan) पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर ‘बिग बॉस 16’ (Bigg Boss 16 )सोबत वापसी करतोय. येत्या आठवड्यात ‘बिग बॉस 16’ सुरू होतोय आणि सध्या या शोची जय्यत तयारी सुरू आहे. यंदाचं बिग बॉसचा 16 वा सीझन नेहमीपेक्षा वेगळा राहणार असल्याची चर्चा आहे. याशिवाय सलमानने या शोसाठी घेतलेल्या मानधनाचीही जोरदार चर्चा रंगली आहे. होय, ‘बिग बॉस 16’ होस्ट करण्यासाठी सलमानने म्हणे 1000 कोटी वसूल केल्याचं म्हटलं जात आहे.  काही मीडिया रिपोर्टनुसार, सलमान खानने शो मेकर्सकडे त्याची फी 3 पट वाढवण्याची मागणी केल्याचा दावा केला होता. सलमान खानने सीजन 15 साठी 350 कोटी रुपये घेतल्याची चर्चा होती. त्यानुसार, हिशोब करायचा झाला तर सीजन 16 साठी सलमान खान 1000 कोटींहून अधिकची मागणी करत असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर सुरु होती. आता खुद्द सलमानने यावर खुलासा केला आहे.

मंगळवारी ‘बिग बॉस 16’च्या पत्रकार परिषदेत सलमान त्याच्या फीबद्दल बोलला. ‘बिग बॉस 16’साठी तुला 1000 कोटी फी मिळाल्याची चर्चा आहे, हे खरं आहे का? असा प्रश्न सलमानला यावेळी विचारण्यात आला. यावर त्याने मजेशीर उत्तर दिलं.

‘इतके पैसे मला माझ्या आयुष्यात कधीच मिळाले नाही. एवढे पैसे मिळाले तर मी कधीच काम करणार नाही. हो, माझा खर्च खूप आहे. जसं की वकीलाचा खर्च... अशा अफवांमुळे इन्कम टॅक्सवाले माझ्यावर लक्ष ठेवून असतात आणि मला भेटायला येतात...माझी फी इतकी नाही. माझी फी या रकमेच्या 1/4 सुद्धा नाही,’ असं तो हसत हसत म्हणाला.


 
 कधी कधी मी त्रासतो...
सलमान बिग बॉसचा 16 वा सीझन होस्ट करणार नाही, अशी चर्चाही मध्यंतरी होती. यावरही सलमान बोलला. तो म्हणाला, ‘कधी कधी मी इरिटेड होतो आणि मी हा शो आता होस्ट करणार नसल्याचं म्हणतो. पण या लोकांना माझ्याशिवाय पर्याय नाही. मी होस्ट करणार नसेल तर मग कोण होस्ट करणार? अर्थात हे त्यांच्यावर अवलंबून आहे. त्यांनी मनात आणलं तर ते माझ्याजवळ येणार नाही. पण त्यांच्याजवळ सध्या पर्याय नाही.’

 हा आहे पहिला स्पर्धक

यंदाच्या सीझनमध्ये कोण कोण बिग बॉसच्या घरात जाणार, याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. अशात पहिल्या स्पर्धकाची ओळख खुद्द सलमानने करून दिली आहे. यंदाच्या सीजनचा पहिला स्पर्धक आहे कझाकिस्तानचा गायक अब्दु रोजिक. पत्रकार परिषदेत सलमान खानने अब्दू रोजिकच्या नावाची घोषणा केली. त्याच्या नावाची घोषणा करताच कझाकस्तानी गायकाने ‘दबंग’ मधील प्रसिद्ध डायलॉगसह एन्ट्री केली. 

Web Title: Salman Khan On Rumours Of Charging Rs 1,000 Crore For Bigg Boss 16 "If I Get This Amount, I Will..."

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.