सलमान खान येणार बिग बॉस मराठीच्या घरात, स्पर्धकांसह साधणार थेट संवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2019 16:26 IST2019-08-10T16:25:18+5:302019-08-10T16:26:11+5:30

बिग बॉसच्या स्पर्धेत टीकून राहण्यासाठी सलमान काही खास टीप्सही स्पर्धकांना देताना दिसणार आहे.

Salman Khan to come to Big Boss Marathi 2 house | सलमान खान येणार बिग बॉस मराठीच्या घरात, स्पर्धकांसह साधणार थेट संवाद

सलमान खान येणार बिग बॉस मराठीच्या घरात, स्पर्धकांसह साधणार थेट संवाद

सलमान खान त्याच्या कमिटमेन्ट पूर्ण करण्यात बिझी आहे. छोट्या पडद्यावर बिग 'बॉस सीझन १3' मधून तो रसिकांच्या भेटीला येतो आहे. मात्र याआधीच त्याने बिग बॉस मराठीच्या शोमध्ये  हजेरी लावल्याचे पाहायला मिळणार आहे. त्याचा अभिनय, त्याचा डान्स, कॉमेडी आणि त्याच्या ना- ना हरकती यावर रसिक फिदा असतात.त्यामुळेच सलमानचे कित्येक फॅन्स त्याच्यावर अक्षरक्ष: जीव ओवाळून टाकतात. त्याची हीच लोकप्रियता इनकॅश करण्यासाठी बिग बॉस मराठी शोमध्ये तो येणार आहे. तसेच आता थेट घरातील स्पर्धकांनाही त्याच्याशी थेट संवाद साधता येणार आहे. बिग बॉसच्या स्पर्धेत टीकून राहण्यासाठी सलमान काही खास टीप्सही स्पर्धकांना देताना दिसणार आहे. त्यामुळे सलमान खानला भेटणे स्पर्धकांसाठी एक मोठी संधीच मिळाली असे म्हणावे लागेल.


बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. घरातील सदस्यांमध्ये बिग बॉसची ट्रॉफी जिंकण्यासाठी चांगलीच चुरस रंगली आहे. त्यात बिग बॉसच्या घरातून नुकतीच रुपाली भोसले बाहेर पडली आहे. रुपाली या शोमधून बाहेर पडल्यानंतर तिने प्रभादेवी येथील सिद्धीविनायक मंदिरात जाऊन गणपतीचं दर्शन घेतलं. तिने यावेळीचे फोटो सोशल मी़डियावर शेअर केले आहेत. 

रुपाली भोसले हिने सोशल मीडियावर सिद्धीविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले. हे फोटो सोशल मीडियावर शेअर करत म्हटलं की, ज्यांनी मला मार्ग दाखवला त्यांच्या आशीर्वादाशिवाय काहीच पूर्ण होणार नाही. मला भविष्यात आणखीन गोष्टींसाठी ताकद मिळो, ही ईश्वरचरणी प्रार्थना.
घरामधून बाहेर पडल्यावर रूपाली भोसलेला तिच्या आतापर्यंच्या प्रवासाची सुंदर एव्ही दाखविली... एक विशेष अधिकार मिळाला आणि तिने ठरवल्याप्रमाणे हीनाला वाचवले. रूपाली म्हणाली मी हे ठरवले होते की मी तुला वाचवेन जेव्हा मी इथे उभे असेन...
 

Web Title: Salman Khan to come to Big Boss Marathi 2 house