सलमान बनला गायक
By Admin | Updated: July 1, 2016 00:58 IST2016-07-01T00:58:55+5:302016-07-01T00:58:55+5:30
‘इंडियाज् गॉट टायलेंट’ या मालिकेचे फायनल काहीच दिवसांत होणार आहे.

सलमान बनला गायक
‘इंडियाज् गॉट टायलेंट’ या मालिकेचे फायनल काहीच दिवसांत होणार आहे. या फायनलच्या आधीच्या भागात सलमान खान आणि अनुष्का शर्मा आपल्याला पाहायला मिळणार आहेत. हे दोघे ‘सुलतान’ या त्यांच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी येणार आहेत. या वेळी सलमानने ‘इंडियाज् गॉट टायलेंट’ या कार्यक्रमाची सूत्रसंचालक भारती सिंगची खूपच टर उडवली. त्यावर भारतीनेही सलमानची टर उडवण्याची एकही संधी सोडली नाही. या सगळ्यामुळे प्रेक्षकांना खळखळून हसण्याची संधी मिळाली. एवढेच नव्हेतर, ‘सुलतान’ या चित्रपटाचे टायटल साँग सलमानने या कार्यक्रमाच्या स्पर्धकांसोबत गायले. सलमानचे गाणे ऐकून प्रेक्षक खूपच खूश झाले.