'सुपर डान्सर सिझन 2' मध्ये अनुराग बसूच्या जागी साजिद खानचा प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2018 14:39 IST2018-01-25T09:09:04+5:302018-01-25T14:39:04+5:30

छोट्या पडद्यावर सुरू असलेला लहान मुलांच्या डान्स रिअॅलिटी शोमध्ये मागील भागांत अतिथी म्हणून फराह खान दिसली होती.या भागात खूप ...

Sajid Khan's entry in place of Anurag Basu in 'Super Dancer Season 2' | 'सुपर डान्सर सिझन 2' मध्ये अनुराग बसूच्या जागी साजिद खानचा प्रवेश

'सुपर डान्सर सिझन 2' मध्ये अनुराग बसूच्या जागी साजिद खानचा प्रवेश

ट्या पडद्यावर सुरू असलेला लहान मुलांच्या डान्स रिअॅलिटी शोमध्ये मागील भागांत अतिथी म्हणून फराह खान दिसली होती.या भागात खूप मजा आली होती कारण फराहने आपल्या लहानपणीच्या अनेक आठवणी यात सांगितल्या होत्या. या भागात फराह आणि गीता कपूर यांच्यातील लोभस नाते देखील दिसले होते तसेच मंचावर येऊन फराहने नृत्याच्या काही स्टेप्स देखील दाखवल्या होत्या.आगामी भागांमध्ये साजिद खान दिसणार आहे पण अतिथी म्हणून नव्हे तर,परीक्षक म्हणून. चित्रपट निर्माता आणि विनोदबुद्धी ठासून भरलेला साजिद खान अनुराग बसूची जागा घेणार आहे आणि सादर होणार्‍या नृत्यांचे परीक्षण करणार आहे. साजिद खानला विचारले असता त्याने सांगितले,“मला वाटते की सुपर डान्सर सत्र 2चा ताबा घेण्यासाठी खान परिवार सुसज्ज आहे. गेल्या आठवड्यात माझी मोठी बहीण फराह खान, जिला मी मजेने मोठा भाऊ म्हणतो, येथे आली होती आणि आज मला या शोमध्ये येण्याचा आणि शिल्पा शेट्टी कुंद्रा व गीता कपूर या माझ्या प्रिय मैत्रिणींसोबत परीक्षक म्हणून काम करण्याचा मान मिळाला आहे. अनुराग बसूच्या खुर्चीत बसून परीक्षण करण्यात आनंद आहे. तो इतका उमदा माणूस आणि उत्तम दिग्दर्शक आहे! मला या कार्यक्रमात वारंवार यायला आवडेल; मी अनुराग बसूच्या जागी आलो आहे म्हणून नाही तर मला हा कार्यक्रम खूपच आवडतो म्हणून. मुलांमध्ये अफाट प्रतिभा आहे आणि इथे येऊन मला आनंद होत आहे.”सर्वांचा लाडका परीक्षक अनुराग बसू चित्रीकरणास येऊ शकला नव्हता कारण सरस्वती पूजेत तो गुंतला होता.साजिद खानने त्याची जागा घेतली आणि आपल्या विनोदी टिप्पण्यांनी तो अनुराग बसूची उणीव नक्कीच भासू देणार नाही.

Also Read:सुपर डान्सर २ च्या चित्रीकरणाच्या वेळी अनुराग बासूला का झाले अश्रू अनावर

या कार्यक्रमात प्रेक्षकांना एकाहून एक सरस परफॉर्मन्स पाहायला मिळत आहे. या कार्यक्रमाची सध्या चांगलीच चर्चा आहे. या कार्यक्रमात शिल्पा शेट्टी, गीता कपूर आणि अनुराग बासू परीक्षकाची भूमिका साकारत आहे. अनुराग बासूला या कार्यक्रमात नुकतेच एक खूप चांगले सरप्राईज मिळाले असून त्यामुळे तो खूपच खूश आहे.अनुराग बासू आणि संगीत दिग्दर्शक प्रीतम चक्रवर्ती हे खऱ्या आयुष्यात खूप चांगले फ्रेंड्स असल्याचे खूपच कमी लोकांना माहीत आहे.ते दोघे अनेक वर्षं एकमेकांचे शेजारी देखील होते.या कार्यक्रमाच्या दरम्यान प्रितमने एक विशेष व्हिडिओ मेसेज शेअर केला आहे.या व्हिडिओत त्याने अनुराग आणि त्यांनी एकत्र घालवलेल्या दिवसांविषयी सांगितले. त्यांच्या जुन्या आठवणी त्याने शेअर केल्या.अनुराग बासू आणि प्रितमची मैत्री अतिशय घट्ट असल्याने हा व्हिडिओ पाहिल्यावर अनुरागला त्याचे अश्रू अनावर झाले. 

Web Title: Sajid Khan's entry in place of Anurag Basu in 'Super Dancer Season 2'