कपिल शर्माचा असाही जबरा फॅन, त्याला भेटण्यासाठी अशी केली धडपड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 06:30 IST2019-04-04T06:30:00+5:302019-04-04T06:30:00+5:30

ब-याचादा फक्त कपिल एकदा तरी भेटू द्या अशी विनंती हा फॅन करायचा मात्र सिक्योरिटी गार्ड त्याला रोखायचे आणि कपिलला न भेटताच त्याला परतावे लागायचे.

Sahu Is The Jabra Fan Of Kapil Sharma | कपिल शर्माचा असाही जबरा फॅन, त्याला भेटण्यासाठी अशी केली धडपड

कपिल शर्माचा असाही जबरा फॅन, त्याला भेटण्यासाठी अशी केली धडपड

सध्या विविध सेलिब्रिटी मंडळी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्सशी कनेक्ट आहेत. ट्विटर,फेसबुक, इन्स्टाग्रामच्या माध्यमातून फॅन्स सेलिब्रिटींशी संवाद साधत असतात. कॉमेडी किंग कपिल शर्माचेही ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टावर अनेक फॅन्स आहेत. मात्र या सगळ्या फॅन्सपैकी एक फॅन कपिलचा ख-या अर्थाने जबरा फॅन ठरला आहे. अगदी निरागस असणा-या या फॅनने  कपिलला भेटण्यासाठी एक वेळा नाही दोन वेळा नाहीतर तब्बल 13 वेळा मुंबईत आला. साहू असे या जबरा फॅनचे नाव आहे.  वारंवार प्रयत्न केल्यानंतर अखेर त्याला यश मिळाले आणि कपिलला भेटण्याची त्याची इच्छाही पूर्ण झाली.

ब-याचादा फक्त कपिल एकदा तरी भेटू द्या अशी विनंती हा फॅन करायचा मात्र सिक्योरिटी गार्ड त्याला रोखायचे आणि कपिलला न भेटताच त्याला परतावे लागायचे. अखेर शक्कल लढवत त्याने कपिलला ट्विट करत भेटण्याची इच्छा व्यक्त केली. कपिलनेही क्षणाचा विलंब न लावता त्याला मुंबईत भेटण्यासाठी बोलावून घेतले. कपिलला भेटून साहूचा आनंदही द्विगुणित झाला होता. त्याने कपिलसह त्याची ही फॅन मोमेंट फोटोही कॅप्चर केले आहेत.

तसेच कपिलने त्याच्या या लाडक्या फॅनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. रसिकांना खळखळून हसवण्यासाठी आणि त्यांचं तुफान मनोरंजन करण्याचे काम कपिल 'कपिल शर्मा शो’ शोच्या माध्यमातून करतो. केवळ भारतातच नाही तर जगभरात त्याचे  फॅन्स पसरलेत. त्याच्या प्रत्येक फॅन्सची काही ना काही खास बात आहे. त्याच यादीत आता साहूचे नाव सामिल झाले आहे. 

 

Web Title: Sahu Is The Jabra Fan Of Kapil Sharma