सहकुटुंब मालिकेतील हा अभिनेता चढला बोहल्यावर, थाटात पार पडला विवाह सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2023 17:00 IST2023-03-18T16:50:19+5:302023-03-18T17:00:20+5:30

वनिता खरात, हार्दिक जोशी-अक्षया देवधर यांच्यानंतर आता मराठी मालिकेतील आणखी एक अभिनेता लग्नबेडीत अडकला आहे.

Sahakutumb Sahapariva actor got married wedding photo come out | सहकुटुंब मालिकेतील हा अभिनेता चढला बोहल्यावर, थाटात पार पडला विवाह सोहळा

सहकुटुंब मालिकेतील हा अभिनेता चढला बोहल्यावर, थाटात पार पडला विवाह सोहळा

सध्या मराठी सिनेइंडस्ट्रीत लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. एकानंतर एक सेलिब्रिटीलग्नबेडीत अडकत आहेत.  अलिकडेच वनिता खरात, मुरांबा मालिकेतील अभिनेता सुमित भोकसेने लग्नगाठ बांधली. यानंतर आता आणखी एक मराठमोळ्या अभिनेता बोहल्यावर  चढला आहे. सोशल मीडियावर त्याच्या लग्नाचे फोटो व्हायरल झालेत. 

छोट्या पडद्यावर विशेष लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे 'सहकुटुंब सहपरिवार' (sahakutumb sahaparivar).  य मालिकेच्या कथानकाने आणि त्यातील पात्रांनी अल्पावधीत लोकप्रियता मिळवली आहे. त्यातलीच एक जोडी म्हण पश्य आणि अंजी. आपल्या खट्याळ स्वभावामुळे या दोन्ही कलाकारांनी अल्पावधीत लोकप्रियता मिळवली. सध्या या मालिकेतील पश्याच्या म्हणजेच अभिनेता आकाश नलावडे (aakash nalawde) याचा पुण्यात थाटामाटात लग्न सोहळा पार पडला. 

आकाशचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. आकाशाच्या रिअल लाईफ अंजीचं नाव रुचिका धुरी आहे. आकाश आणि रुचिकाच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.  आकाश नलावडेच्या लग्नाला मराठी कलाविश्वातील अनेक सेलिब्रेटीनी हजेरी लावली.

काही दिवसांपूर्वीच आकाशचा साखरपुडा पार पडला होता. आकाश आणि त्याच्या पत्नीसाठी 'सहकुटुंब सहपरिवारा'च्या टीमने केळवण केलं होतं. या केळवणाचे फोटो अभिनेत्री नंदिता पाटकरने (nandita patkar) शेअर केले होते.

Web Title: Sahakutumb Sahapariva actor got married wedding photo come out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.