'प्रेमाची गोष्ट' मालिकेतील सागर-मुक्ताचा संगीत सोहळा, हे कलाकार लावणार हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2023 14:43 IST2023-12-18T14:43:20+5:302023-12-18T14:43:39+5:30

Premachi Goshta : 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत सुरु आहे मुक्ता आणि सागरच्या लग्नाची धामधूम. सईवरच्या प्रेमाखातर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतलाय.

Sagar-Mukta's music ceremony in series 'Premachi Goshta', this artist will be present | 'प्रेमाची गोष्ट' मालिकेतील सागर-मुक्ताचा संगीत सोहळा, हे कलाकार लावणार हजेरी

'प्रेमाची गोष्ट' मालिकेतील सागर-मुक्ताचा संगीत सोहळा, हे कलाकार लावणार हजेरी


स्टार प्रवाहच्या प्रेमाची गोष्ट मालिकेत सुरु आहे मुक्ता आणि सागरच्या लग्नाची धामधूम. सईवरच्या प्रेमाखातर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. हो - नाही म्हणता म्हणता, मुक्ता सागर अखेर विवाहबंधनात अडकणार आहेत. साखरपुडा आणि मेहंदी समारंभ थाटात पार पडल्यानंतर आता उत्सुकता आहे ती संगीत सोहळ्याची. संगीत सोहळ्यात मन धागा धागा जोडते नवा, लग्नाची बेडी, अबोली आणि पिंकीचा विजय असो मालिकेतील कलाकार खास हजेरी लावणार आहेत. 

दोन्ही कुटुंबाची मतं, रितीरिवाज वेगवेगळे असले तरी या दोन्ही कुटुंबांना जोडणारा दुवा म्हणजे सई. सईवरच्या याच प्रेमापोटी फक्त सागर आणि मुक्ता नाही तर गोखले आणि कोळी परिवार एकत्र येणार आहे. लवकरच मुक्ता सागर अखेर विवाह बंधनात अडकणार आहेत. नुकताच त्यांचा साखरपुडा आणि मेहंदी कार्यक्रम पार पडला. आता त्यांचा संगीत सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यात मन धागा धागा जोडते नवा, लग्नाची बेडी, अबोली आणि पिंकीचा विजय असो मालिकेतील कलाकार हजेरी लावून चारचाँद लावणार आहेत. 

 संगीत सोहळ्यात स्टार प्रवाह परिवारासोबतच मुक्ता आणि सागरचा खास परफॉर्मन्स देखील पाहायला मिळणार आहे. चिमुकली सईही मी हाय कोळी गाण्यावर ठेका धरणार आहे. तेव्हा मनोरंजनाने परिपूर्ण असा हा संगीतसोहळा पाहायला विसरु नका. १८ ते २० डिसेंबरला रात्री ८ वाजता फक्त स्टार प्रवाहवर पाहायला मिळणार आहे. दरम्यान सावनीला अद्याप माहित नाही की, मुक्ता सागरसोबत लग्न करणार आहे. त्यामुळे तिला त्यांच्या लग्नाच्या आधी हे कळेल का आणि कळल्यावर ती लग्नात काही गोंधळ घालेल का हे पाहणे कमालीचे ठरणार आहे. 
 

Web Title: Sagar-Mukta's music ceremony in series 'Premachi Goshta', this artist will be present