खान्देशचा सुपुत्र सचिन कुमावतची 'बिग बॉस मराठी'च्या घरात एन्ट्री, म्हणाला "ट्रॉफी जिंकणारच..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 21:26 IST2026-01-11T21:24:56+5:302026-01-11T21:26:45+5:30
'बिग बॉस मराठी ६'च्या घराला खान्देशी तडका द्यायला आलाय गायक सचिन कुमावत!

खान्देशचा सुपुत्र सचिन कुमावतची 'बिग बॉस मराठी'च्या घरात एन्ट्री, म्हणाला "ट्रॉफी जिंकणारच..."
Sachin Kumavat Entry in Bigg Boss Marathi 6 : 'बिग बॉस मराठी'च्या सहाव्या पर्वाला आजपासून सुरुवात झाली आहे. रितेश देशमुखच्या उपस्थितीत हा ग्रँड प्रीमियर सोहळा पार पडतोय. अभिनेत्री आणि राजकारणी दिपाली सय्यद, अभिनेता सागर कारंडे यांच्यानंतर प्रसिद्ध अहिराणी गायक सचिन कुमावतने 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात एन्ट्री घेतली आहे. खान्देशचा आवाज आता महाराष्ट्राच्या सर्वात मोठ्या रिअॅलिटी शोमध्ये घुमणार आहे.
'बिग बॉस मराठी ६'मध्ये सचिन कुमावतचे स्वागत करताना रितेश देशमुखने त्याच्या प्रवासाचे आणि गाण्याचं भरभरून कौतुक केले. मेहनत आणि शॉर्टकट या पर्यायापैकी त्यानं मेहनतीच दार निवडत ट्रॉफी जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला.
सचिन कुमावत हा खान्देशातील एक प्रसिद्ध मराठी गायक, संगीतकार आणि निर्माता आहे. त्याच्या अहिराणी गाण्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. त्याचे 'बबल्या ईकस केसावर फुगे' हे गाणे विशेषतः उल्लेखनीय आहे. ज्याला यूट्यूबवर २४ कोटींपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले होते. दरम्यान, अलिकडेचं सचिनचं 'रस प्यायला ये म्हणलं माय' हे गाणं सोशल मीडियावर तुफान व्हायरलं झालं होतं. सचिनचा महाराष्ट्रात मोठा चाहतावर्ग आहे. आता 'बिग बॉस'च्या आव्हानात्मक घरात सचिन कसा टिकणार, याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांना लागली आहे.