सब्यसाची करणार प्रेरणाच्या लग्नाच्या पोशाखांचे डिझाईन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2018 13:58 IST2018-11-22T13:57:18+5:302018-11-22T13:58:37+5:30

'कसौटी जिंदगी की २' या मालिकेत सध्या प्रेरणा आणि नवीन यांच्या विवाहाची लगबग सुरू असून त्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत.

Sabyasachi to design wedding outfits for Prerna in Kasauti jibdagi ki 2 | सब्यसाची करणार प्रेरणाच्या लग्नाच्या पोशाखांचे डिझाईन

सब्यसाची करणार प्रेरणाच्या लग्नाच्या पोशाखांचे डिझाईन

ठळक मुद्देप्रेरणाच्या विवाहासाठी सब्यसाची खास पोशाख करणार डिझाईन

स्टार प्लसवरील 'कसौटी जिंदगी की २' मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली असून या मालिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. सध्या या मालिकेत सध्या प्रेरणा आणि नवीन यांच्या विवाहाची लगबग सुरू असून त्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. मालिकेतील या विवाहाची जोरदार तयारी सुरू असून आता या विवाहाला ग्लॅमरची झळाळी देण्यासाठी नामवंत फॅशन डिझायनर सब्यसाची हा प्रेरणाच्या विवाहासाठीचे सर्व पोशाख डिझाईन करणार आहे.


बॉलिवूडच्या आघाडीच्या तारकांच्या लग्नासाठी फॅशनेबल पोशाख डिझाईन करणारा सब्यसाची प्रथमच छोट्या पडद्यावरील 'कसोटी जिंदगी की २' मालिकेतील प्रेरणा (एरिका फर्नांडिस) या नायिकेच्या विवाहासाठी कपडे तयार करणार आहे. या घटनेवर एका सूत्राने सांगितले, प्रेरणाच्या विवाहाच्या दिवसासाठी सब्यसाची खास पोशाख डिझाईन करणार आहे. हा पोशाख भरजरी असला, तरी त्यावर पारंपरिक बंगाली संस्कृतीची छाप असेल. प्रेरणाच्या साध्या आणि सुज्ञ स्वभावाला साजेसा असा हा पोशाख असेल. तसेच विवाहाच्या इतर समारंभांसाठी लागणारे लेहंगा वगैरे पोशाखही सब्यसाचीच डिझाईन करणार आहे. एरिकाचा सब्यसाची हा अतिशय आवडता डिझायनर असून आता तोच तिच्यासाठी कपडे डिझाईन करीत असल्यामुळे ती खूपच खुशीत आहे.
स्टार प्लसवरील 'कसोटी जिंदगी की २' मालिकेतील प्रेरणा आणि नवीन यांच्या विवाहात मिळणाऱ्या नव्या कलाटण्यांमुळे हा प्रसंग अतिशय उत्कंठावर्धक बनणार आहे. आता प्रेरणाचा सब्यसाचीने डिझाईन केलेले पोशाख रसिकांच्या पसंतीस पडतात, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.  

Web Title: Sabyasachi to design wedding outfits for Prerna in Kasauti jibdagi ki 2