'साथ निभाना साथिया' फेम कोकिला उर्फ रूपल पटेल हॉस्पिटलमध्ये दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2021 16:19 IST2021-07-07T16:19:02+5:302021-07-07T16:19:28+5:30

रूपल पटेल यांना नेमके काय झाले आहे, हे समजू शकलेले नाही.

'Saath Nibhana Saathiya' fame Kokila alias Rupal Patel admitted to hospital | 'साथ निभाना साथिया' फेम कोकिला उर्फ रूपल पटेल हॉस्पिटलमध्ये दाखल

'साथ निभाना साथिया' फेम कोकिला उर्फ रूपल पटेल हॉस्पिटलमध्ये दाखल

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका साथ निभाना साथियामधून कोकिलाबेनच्या भूमिकेतून घरात पोहचलेली अभिनेत्री रूपल पटेल यांची तब्येत ठीक नाही. असे समजते आहे की, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. असे सांगितले जात आहे की मागील काही दिवसांपासून त्या रुग्णालयात दाखल आहेत. रुपल यांना काय झाले आहे, हे समजू शकलेले नाही. मात्र त्यांचा नवरा राधा कृष्ण दत्त यांनी प्रतिक्रिया समोर आली आहे.


इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, रुपल पटेलच्या नवऱ्याने सांगितले की, रुपल आता ठीक आहे आणि काळजी करण्याची गरज नाही. असे सांगितले जात आहे की रूपल पटेलला लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाणार आहे. त्यांच्या तब्येतीत सुधारणा होते आहे.


तर अभिनेत्रींशी निगडीत सूत्रांनी सांगितले की, रूपल पटेल हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत आणि सध्या ठीक आहे. पुढील ३-४ दिवसांत त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळणार आहे. सूत्रांनी पुढे सांगितले की, त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यामागचे कारण सांगितले नाही.


मागील वर्षी रूपल पटेल त्यावेळी चर्चेत आली होती जेव्हा यशराज मुखतेने कोकिलाबेनची भूमिका आणि संवाद रसोडे में कौन थावर मजेशीर रॅप बनवला होता. रूपल पटेल पॅनोरमा आर्ट थिएटर नावाने थिएटर ग्रुप चालवते. त्यांनी बऱ्याच लोकप्रिय मालिकेत काम केले आहे. ज्यात ये रिश्ते हैं प्यार के, साथ निभाना साथिया २ या मालिकांचा समावेश आहे. याशिवाय त्यांनी काही चित्रपटातही काम केले आहे. रूपल पटेल २०१७ सालापासून स्वच्छ भारत अभियानाची ब्रॅण्ड अॅम्बेसिडर देखील आहे. 

Web Title: 'Saath Nibhana Saathiya' fame Kokila alias Rupal Patel admitted to hospital