‘साथ दे तू मला’ मालिकेच्या शीर्षकगीताला मिळतेय प्रेक्षकांची पसंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 20:24 IST2019-04-01T20:24:08+5:302019-04-01T20:24:36+5:30

स्टार प्रवाह वाहिनीवर सुरु झालेल्या ‘साथ दे तू मला’ या मालिकेला आणि मालिकेच्या शीर्षक गीताला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळताना दिसतो आहे.

'Saath De Tu Mala' series gets the title song, the audience likes | ‘साथ दे तू मला’ मालिकेच्या शीर्षकगीताला मिळतेय प्रेक्षकांची पसंती

‘साथ दे तू मला’ मालिकेच्या शीर्षकगीताला मिळतेय प्रेक्षकांची पसंती

स्टार प्रवाह वाहिनीवर सुरु झालेल्या ‘साथ दे तू मला’ या मालिकेला आणि मालिकेच्या शीर्षक गीताला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. अवघ्या काही दिवसांत या मालिकेच्या शीर्षक गीताला १० लाखांहून जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. ‘स्टार प्रवाह’च्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवरुन हा व्हिडिओ दहा लाखांहून अधिक प्रेक्षकांनी पाहिला आहे.


राहुल वैद्य आणि केतकी माटेगावकरने हे शीर्षकगीत गायले असून सुप्रसिद्ध संगीतकार निलेश मोहरीरने या गाण्याला संगीत दिले आहे. गीतकार श्रीपाद जोशींनी हे गाणे लिहिले आहे.

या शीर्षकगीताला मिळणारा प्रतिसाद पाहून आनंद वाटत असल्याची भावना संगीतकार नीलेश मोहरीर यांनी व्यक्त केली. याचे संपूर्ण श्रेय टीमला जाते. गायक, संगीतकार आणि गीतकारांसोबत मालिकेतले कलाकार आणि दिग्दर्शक यांचा सुद्धा या यशात मोलाचा वाटा आहे. या गाण्याच्या निमित्ताने छान भट्टी जमून आली आहे. स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे यांनी माझ्यावर हा विश्वास दाखवला त्याबद्दल त्यांचे आभार अशी भावना निलेशने व्यक्त केली.
‘साथ दे तू मला’ या मालिकेच्या पुढील भागांमध्येही बऱ्याच इण्टरेस्टिंग घडामोडी पाहायला मिळणार आहेत. त्यासाठी पाहायला विसरु नका साथ दे तू मला सोमवार ते शनिवार सायंकाळी ७.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.
 

Web Title: 'Saath De Tu Mala' series gets the title song, the audience likes