ऋतुजा बागवेची नवीन हिंदी मालिका 'माटी से बंधी डोर', प्रोमोला मिळतेय पसंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2024 14:01 IST2024-05-09T14:01:18+5:302024-05-09T14:01:47+5:30

Rutuja Bagwe : स्टार प्लस वाहिनीवर लवकरच दाखल होणाऱ्या 'माटी से बंधी डोर'मध्ये ऋतुजा बागवे दिसणार आहे. यात तिने वैजू या मराठमोळ्या तरूणीची भूमिका साकारली आहे.

Rutuja Bagwe's new Hindi serial 'Maati Se Bandhi Door', promo is getting rave reviews | ऋतुजा बागवेची नवीन हिंदी मालिका 'माटी से बंधी डोर', प्रोमोला मिळतेय पसंती

ऋतुजा बागवेची नवीन हिंदी मालिका 'माटी से बंधी डोर', प्रोमोला मिळतेय पसंती

अभिनेत्री ऋतुजा बागवे (Rutuja Bagwe) मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. मराठी मालिका, चित्रपट आणि नाटक अशा तिन्ही माध्यमात आपल्या अभिनय कौशल्याने तिने रसिकांच्या मनात घर केले आहे. शेवटची ती लंडन मिसळ या चित्रपटात पाहायला मिळाली होती. दरम्यान आता ती हिंदी मालिकेत काम करताना दिसणार आहे. स्टार प्लस वाहिनीवर लवकरच दाखल होणाऱ्या 'माटी से बंधी डोर'मध्ये ती दिसणार आहे. यात तिने वैजू या मराठमोळ्या तरूणीची भूमिका साकारली आहे.

ऋतुजा बागवेची नवीन हिंदी मालिका माटी से बंधी डोरचा प्रोमो नुकताच समोर आला आहे. या प्रोमोत पाहायला मिळतंय की, ऋतुजाची बाइकवरून दमदार एंट्री होते. मग ती बैलाला म्हणते की राजा तू करेगा आराम वैजू करेगी तेरा काम. मग ती शेतात जमीन कसताना दिसते आहे. तितक्यात तिची आई तिला आवाज देत सांगते की, वैजू तुला सांगितले होते ना तुला बघायला मुलगा येणार आहे. आधीच १७ मुले तुला नाकारून गेले आहेत. त्यावर वैजू म्हणते की त्या १७ लोकांच्या नशीबात मी नव्हते. तितक्यात तिथे एक मुलगा गाडीतून येतो तो विचारतो कदमांचे घर कुठे आहे? त्यावर वैजू बोलते आमचे घर. पुढून उजव्या बाजूला. चला. त्यावेळी तिला आई बोलते की पाहायला आलेला मुलगा आहे. त्यानंतर त्या मुलाला स्थळ दाखवणारा व्यक्ती म्हणतो की हीच ती मुलगी आहे. त्यावर तो म्हणतो की, ही मुलगी आणि हादेखील तिला नाकारतो. वैजू या तरूणीवर आधारीत ही मालिका आहे. 

ऋतुजाने हा प्रोमो शेअर करत सांगितले की, लवकरच ही मालिका भेटायला येणार आहे. या प्रोमोवर चाहत्यांसह सेलिब्रेटीही तिला शुभेच्छा देताना दिसत आहेत. प्राजक्ता माळीने लिहिले की, क्या बात है...अभिनंदन. स्पृहा जोशीने म्हटले की, अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी तुला खूप शुभेच्छा. तितिक्षा तावडेने कमेंटमध्ये लिहिले की, खूप मोठी गोष्ट आहे आणि खूप अप्रतिम दिसते आहे. अभिनंदन. याशिवाय अमृता खानविलकर, सुबोध भावे, दीप्ती देवी, अश्विनी कासार, अश्विनी महागडे, सायली संजीव यांच्यासह बऱ्याच कलाकारांनी तिचे अभिनंदन केले आहे.    

Web Title: Rutuja Bagwe's new Hindi serial 'Maati Se Bandhi Door', promo is getting rave reviews