रुहीने नेसली साडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2016 12:28 IST2016-07-13T06:58:10+5:302016-07-13T12:28:10+5:30
ये है मोहोब्बते या मालिकेत टॉम बॉयची भूमिका साकारणारी रुही लवकरच प्रेक्षकांना साडीत पाहायला मिळणार आहे. या मालिकेत नेहमीच ...
रुहीने नेसली साडी
य है मोहोब्बते या मालिकेत टॉम बॉयची भूमिका साकारणारी रुही लवकरच प्रेक्षकांना साडीत पाहायला मिळणार आहे. या मालिकेत नेहमीच इशिता कांजीवरम साड्या घालते. तिची मुलगी रुहीदेखील तिच्याप्रमाणेच आता एका भागासाठी कांजीवरम साडीत झळकणार आहे. मालिकेत एक पार्टीतील दृश्य दाखवले जाणार आहे. खास या दृश्यात ती साडी नेसणार आहे. पण यामुळे रुहीच्या ऐवजी इशिताचे अपहरण होणार आहे. या मालिकेतील रुहीची भूमिका साकारणाऱ्या आदिती भाटियासाठी साडी नेसून चित्रीकरण करणे हे खूपच कठीण होते. प्रेक्षकांना रुहीचे हे नवे रूप नक्कीच आवडेल अशी आशा करायला हरकत नाही.