बिग बॉस मराठी २ : वीणाच्या वागण्यामुळे रुपाली दुखावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2019 15:21 IST2019-07-09T15:12:12+5:302019-07-09T15:21:21+5:30

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रुपाली आणि वीणा यांची खूप घनिष्ठ मैत्री आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि हि गोष्ट या दोघींनीही वेळोवेळी घरातल्या सदस्यांना सांगितली देखील आहे

Rupali got hurt because of veena's behaviour in bigg boss house | बिग बॉस मराठी २ : वीणाच्या वागण्यामुळे रुपाली दुखावली

बिग बॉस मराठी २ : वीणाच्या वागण्यामुळे रुपाली दुखावली

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रुपाली आणि वीणा यांची खूप घनिष्ठ मैत्री आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि हि गोष्ट या दोघींनीही वेळोवेळी घरातल्या सदस्यांना सांगितली देखील आहे... एकच फाईट वातावरण टाईट या टास्कमध्ये देखील रुपालीने तिचा किशोरी शहाणे यांच्यावरचा राग व्यक्त करताना हि गोष्ट सांगितली... वीणा आणि शिवबद्दल जी गोष्ट बोलीस ती मला नाही आवडली कारण मी तिच्याबद्दल ओव्हर प्रोटेक्टिव्ह आहे आणि राहीन. शिवला देखील रुपाली बऱ्याचदा टोकताना दिसते कि, मी आणि वीणा बोलत असताना किशोरीताईला देखील येऊ देत नाही त्यामुळे तू नको असं करुस...

 
पण आता या मैत्रीमध्ये कुठेतरी फूट पडते आहे असे दिसून येत आहे..  काल देखील बिग बॉस यांनी दिलेल्या शिक्षेचे गांभीर्य दोघांना नाही असे तिचे म्हणणे पडले... आज देखील वीणाबद्दल बोलताना तिने घरातील सदस्यांना सांगितले, “हक्क हा फक्त एका बाजूनेच नसतो तो दोन्ही बाजूंनी हवा. मी काय पूर्ण आजारी आहे अशातला भाग नाहीये, पण माझा पायाला दुखापत झाली आहे.  कोणीच नाहीये मला इथे मी हे बोलते आहे पण, माझ्याकडे “शिव” सारखा कोणी मित्र नाहीये, जो मला भरवेल किंवा दिवसभर माझी काळजी घेईल. पण तू जर ठामपणे म्हणतेस तू ती व्यक्ती आहेस मग तू दिसत नाहीस. मग वाग तशी, काल  मी रात्री झोपले तेव्हा सुध्दा रडत होते, पण बाजूला झोपलेल्या माणसाच्या मनामध्ये इतका राग आहे  कि मला एकदाही विचारलं नाही खरंच त्रास होतो आहे का ?, खूप दुखत आहे का ?  

 या सगळ्या मुद्द्यांवर वैशाली म्हणाली, पण तुम्ही एकमेकींना खूप समजून घेता अस जे म्हणता जर ते नाहीये असं तू म्हणतेस तर मला तुमच्या नात्यावर प्रश्नचिन्ह पडलं आहे. यावर अभिजीत केळकर म्हणाला, मला वाटत कि, ही खूप वैयक्तिक गोष्ट आहे. त्या दोघींनासुध्दा कळलेले आहे एकमेकींना काय वाटत आहे... मला असं वाटत त्या दोघींनी एकमेकींशी बोलावं किंवा नाही बोलावं हे त्यांना ठरवू दे ... कोणी कोणाची बाजू घेऊ नका आणि कोणाच्या विरुद्ध देखील बोलू नका. याबाबत हिनाशी देखील रुपाली बोलताना काय झालं पुन्हा सांगितले आणि त्यावर हीनाचे म्हणणे होते वीणाचे “कामा पुरता ” असत तस आहे ...

Web Title: Rupali got hurt because of veena's behaviour in bigg boss house