रुपाली भोसलेच्या मर्सिडीज कारचा अपघात, अभिनेत्रीने शेअर केला व्हिडीओ; काही महिन्यांपूर्वीच घेतलेली गाडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 10:27 IST2025-09-29T10:27:04+5:302025-09-29T10:27:36+5:30
रुपालीच्या नव्या गाडीचा अपघात झाला आहे. इन्स्टाग्रामवरुन रुपालीने तिच्या गाडीचा व्हिडीओ शेअर केला आहे.

रुपाली भोसलेच्या मर्सिडीज कारचा अपघात, अभिनेत्रीने शेअर केला व्हिडीओ; काही महिन्यांपूर्वीच घेतलेली गाडी
रुपाली भोसले हा मराठी टेलिव्हिजनचा लाडका चेहरा आहे. अनेक मालिकांमध्ये काम केलेल्या रुपालीला 'आई कुठे काय करते' या मालिकेमुळे प्रसिद्धी मिळाली. या मालिकेत संजना ही खलनायिकेची भूमिका साकारून रुपाली घराघरात पोहोचली. रुपाली नवीन प्रोजेक्ट आणि वैयक्तिक आयुष्याबाबत चाहत्यांना सोशल मीडियावरुन माहिती देत असते. रुपालीच्या नव्या गाडीचा अपघात झाला आहे.
इन्स्टाग्रामवरुन रुपालीने तिच्या गाडीचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रुपालीच्या मर्सिडीज कारचा अपघात झाल्याचं स्पष्ट दिसत आहे. "अपघात झाला, वाईट दिवस", असं तिने व्हिडीओ शेअर करत म्हटलं आहे. काही महिन्यांपूर्वीच रुपालीने ही मर्सिडीज कार खरेदी केली होती. २०२५च्या जानेवारी महिन्यात मर्सिडीज घेतल्याची खूश खबर तिने दिली होती. पण, आता तिच्या गाडीचा अपघात झाला आहे.
सध्या रुपाली लपंडाव या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेत रुपाली सरकार ही खलनायिकेची भूमिका साकारत आहे. मन उधाण वाऱ्याचे, शेजारी शेजारी पक्के शेजारी, वहिनीसाहेब या मालिकांमध्ये ती दिसली होती. तर बडे दूर से आए है, तेनाली रामा अशा हिंदी मालिकांमध्येही ती झळकली आहे.