​‘स्टार प्लस’वरील ‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’मध्ये रुख्सार रेहमान साकारणार ही भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2018 16:15 IST2018-05-03T10:45:15+5:302018-05-03T16:15:15+5:30

‘स्टार प्लस’वर लवकरच आणखी एक अतिशय रंजक मालिका सुरू होणार आहे. ‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ नावाची ही मालिका मरियम ...

Role of Rukhsar Rehman in 'Miriam Khan - Reporting Live' on 'Star Plus' | ​‘स्टार प्लस’वरील ‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’मध्ये रुख्सार रेहमान साकारणार ही भूमिका

​‘स्टार प्लस’वरील ‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’मध्ये रुख्सार रेहमान साकारणार ही भूमिका

्टार प्लस’वर लवकरच आणखी एक अतिशय रंजक मालिका सुरू होणार आहे. ‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ नावाची ही मालिका मरियम खान नावाच्या एका लहान मुलीची आणि तिच्या दृष्टीने जग कसे आहे, त्याची कथा आहे. या मालिकेत महीदा खान हिची भूमिका रंगविण्यासाठी नामवंत अभिनेत्री रुख्सार रेहमान या नामवंत अभिनेत्रीची निवड करण्यात आल्याचे आमच्या कानावर आले आहे. महीदा ही मरियमची आणि तिच्या दोन मोठ्या बहिणी मेहेर आणि माहिरा यांची आई असून खान कुटुंबातील सून आहे. या मालिकेद्वारे रुख्सार तब्बल चार वर्षांनंतर टीव्हीवर पुनरागमन करत आहे. रुक्सार रहमानने याद रखेगी दुनिया या चित्रपटाद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर सरकार, गॉड तुसी ग्रेट हो, भेजा फ्राय, पीके यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने खूप चांगल्या भूमिका साकारल्या. तिने चित्रपटांप्रमाणे मालिकेत देखील काम केले आहे. कुछ तो लोग कहेंगे, तुम्हारी पाखी, और प्यार हो गया यांसारख्या मालिकांमध्ये ती झळकली होती. 
‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ ही मालिका आजवरच्या मालिकांपेक्षा खूप वेगळी आहे. या मालिकेद्वारे एक खूप वेगळी कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. रुख्सार रेहमान गेल्या अनेक वर्षांपासून अभिनय क्षेत्रात आहे. आजवर तिने साकारलेल्या भूमिकांपेक्षा तिची या मालिकेतील भूमिका खूपच वेगळी आहे. त्यामुळे मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह या मालिकेत काम करण्यास ती प्रचंड उत्सुक आहे. या मालिकेतील तिच्या भूमिकेवर ती सध्या प्रचंड मेहनत घेत आहे. तिच्या मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह या मालिकेतील भूमिकेविषयी रुख्सार रेहमान सांगते, “सध्या ज्या प्रकारच्या मालिका प्रसारित होत आहेत, ते पाहता ‘मरियम खान…’ ही मालिका एक ताज्या हवेची झुळूक ठरेल. मला तिची कथा-संकल्पना खूप आवडली. मी साकारत असलेल्या महीदाच्या व्यक्तिरेखेला बरेच पैलू असल्याने ती रंगविण्यास मी उत्सुक झाले आहे.”
‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ ही वेगळ्या साच्यातील मालिका प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी या मालिकेच्या टीमला खात्री आहे. 

Web Title: Role of Rukhsar Rehman in 'Miriam Khan - Reporting Live' on 'Star Plus'