​&TV वरील 'मेरी हानिकारक बीवी'मध्ये सयंतनी घोष दिसणार या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2018 16:36 IST2018-05-07T11:06:00+5:302018-05-07T16:36:00+5:30

&TV वरील लोकप्रिय मालिका 'मेरी हानिकारक बीवी'ने प्रेक्षकांना आकर्षून घेण्यात कोणतीच कसर सोडलेली नाही. ही मालिका सुरू होऊन काहीच ...

In the role of 'my harmful wife' on TV & in which she will appear | ​&TV वरील 'मेरी हानिकारक बीवी'मध्ये सयंतनी घोष दिसणार या भूमिकेत

​&TV वरील 'मेरी हानिकारक बीवी'मध्ये सयंतनी घोष दिसणार या भूमिकेत

&TV
वरील लोकप्रिय मालिका 'मेरी हानिकारक बीवी'ने प्रेक्षकांना आकर्षून घेण्यात कोणतीच कसर सोडलेली नाही. ही मालिका सुरू होऊन काहीच दिवस झाले असले तरी या मालिकेला प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळत आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. या मालिकेत नेहमीच नवनवीन ट्विस्ट येत असतात. त्यामुळे या मालिकेचे रंजक कथानक प्रेक्षकांना प्रचंड आवडते. आता या मालिकेत नवा ट्विस्ट येणार आहे. त्यामुळे मालिका अधिकच मनोरंजक होणार आहे.
'मेरी हानिकारक बीवी' या मालिकेमधील नवीन ट्विस्टमध्ये अखिलेशचा भूतकाळ त्याच्यासमोर येणार आहे. मालिकेमधील ड्रामा अधिक रोमांचक बनणार आहे. टेलिव्हिजनवरील लोकप्रिय चेहरा सयंतनी घोष या मालिकेमध्ये प्रवेश करणार आहे. ती अखिलेश आणि ईरा यांच्या जीवनामध्ये वादळ निर्माण करणार आहे. सयंतनी घोष नीरजाची भूमिका साकारताना दिसणार आहे. नीरजा ही गुल्कीची (नीता शेट्टी) बहीण आहे आणि ती बनारसमध्ये अखिलेशच्या शाळेमध्ये शिक्षिका होती. तिची भूमिका अखिलेशच्या भूतकाळातील घटनांना समोर आणणार आहे. तिच्यामुळेच अखिलेशने शाळेत जाणे सोडून दिले होते आणि गुप्तपणे तिच्यापासून दूर निघून गेला होता. सयंतनीची भूमिका अखिलेशचे जीवन पूर्णत: बदलणार आहे. संयतीने कुमकुम, नागिन, मेरी माँ, महाभारत, इतना करो ना मुझसे प्यार यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. ती नुकतीच नामकरण या मालिकेत झळकली होती. 'मेरी हानिकारक बीवी' या मालिकेमधील आपल्या भूमिकेबाबत बोलताना सयंतनी सांगते, ''&TV वरील 'मेरी हानिकारक बीवी' या मालिकेमध्ये प्रमुख भूमिका साकारायला मिळत असल्याचा मला खूप आनंद झाला आहे. नीरजा अखिलेशच्या भूतकाळामध्ये मी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. ज्यामुळे त्याच्या जीवनावर मोठा परिणाम झाला होतो आणि आता माझ्या भूमिकेच्या प्रवेशामुळे त्याच्या जीवनात आणखी उलथापालथ होणार आहे. प्रेक्षकांना अनेक ड्रामा आणि ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत. मी प्रेक्षकांची प्रतिक्रिया पाहण्यासाठी खूपच उत्सुक आहे.''
अखिलेश आपल्या भूतकाळाचा पुन्हा सामना करेल का? ईरा त्याची बाजू घेऊन त्याला नीरजाशी सामना करण्यामध्ये मदत करेल का? यांसारख्या प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना 'मेरी हानिकारक बीवी' या मालिकेच्या आगामी भागांमध्ये मिळणार आहेत. 

Also Read : म्हणून 'मेरी हानिकारक बीवी'च्या सेटवर लारा दत्ताची एंट्री

Web Title: In the role of 'my harmful wife' on TV & in which she will appear