​मनराज सिंह जिंदगी के क्रॉसरोड्समध्ये दिसणार या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2018 06:58 AM2018-06-15T06:58:35+5:302018-06-15T12:28:35+5:30

डिजिटल माध्यमामुळे नावारूपाला आलेला अभिनेता मनराज सिंह सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील जिंदगी के क्रॉसरोड्स या कार्यक्रमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ...

In the role of Manoraj Singh in Crossroads of Zindagi | ​मनराज सिंह जिंदगी के क्रॉसरोड्समध्ये दिसणार या भूमिकेत

​मनराज सिंह जिंदगी के क्रॉसरोड्समध्ये दिसणार या भूमिकेत

googlenewsNext
जिटल माध्यमामुळे नावारूपाला आलेला अभिनेता मनराज सिंह सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील जिंदगी के क्रॉसरोड्स या कार्यक्रमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमातील एका कथेत तो दिसणार असून यासाठी त्याने नुकतेच चित्रीकरण केले. या कार्यक्रमात वास्तव आणि कल्पिताचे सह-अस्तित्व असून राम कपूर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतो तर महादेव यांनी या कार्यक्रमाचे लेखन केले आहे. या कार्यक्रमाच्या प्रत्येक भागात एक नवीन गोष्ट प्रेक्षकांना पाहायला मिळते आणि त्या गोष्टीतील नायकाच्या पुढे असलेला क्रॉस रोड स्टुडिओतील प्रेक्षकांपुढे चर्चेसाठी खुला केला जातो. या कार्यक्रमाचा फॉरमॅट अतिशय नवीन असून प्रेक्षकांना आजच्या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमापेक्षा एक वेगळा कार्यक्रम पाहायला मिळत आहे. या कार्यक्रमाचा फॉरमॅट वेगळा असल्याने या कार्यक्रमाकडून प्रेक्षकांना खूप साऱ्या अपेक्षा आहेत.
जिंदगी के क्रॉसरोड्समध्ये प्रेक्षकांना ‘घटस्फोटाचे आमंत्रण’ या विषयावर एक गोष्ट पाहायला मिळणार आहे. या कथेत मनराज पतीची भूमिका साकारणार आहे. त्याला आपल्या पत्नीचा भूतकाळ सतावत असतो. त्याने आपल्या या कार्यक्रमाच्या चित्रीकरणाच्या अनुभवाविषयी सांगितले, “मी पहिल्यांदाच काहीशी नकारात्मक भूमिका साकारत आहे आणि ती खूप छान जमली आहे. ही गोष्ट आणि व्यक्तिचित्रण खूप वेगळे आणि अफलातून आहे. मी विहानची भूमिका साकारत आहे. भूतकाळात त्याच्या पत्नीने तिच्या मित्रासोबत एक रात्र घालवली होती हे समजल्यानंतर तो विचलित झाला आहे. आपल्या सुरक्षित भविष्यासाठी त्याला आताच निर्णय घ्यायचा आहे. ही खूपच रोचक गोष्ट आहे.”
जीवनात आपण जे निर्णय घेतो आणि त्यामुळे आपल्या जीवनाला जो आकार मिळतो, त्याबाबत असलेला हा कार्यक्रम अंतर्दृष्टी आणि अभिप्राय यांची एक भावनिक सफर घडवतो. इतर लोकांच्या समस्या आणि दुविधा यांच्या मार्फत लोकांना त्यांचे स्वतःचे मूल्यमापन करण्याची संधी एका नावीन्यपूर्ण आणि परस्पर-संवादात्मक फॉरमॅटमधून देणे हे या कार्यक्रमाच्या निर्मात्याचे लक्ष्य आहे आणि जीवनासाठी मार्गदर्शकाची ही गरज पूर्ण करण्यासाठी प्रसिद्ध बॉलिवूड फॅशन डिझाइनर आणि निर्माती शबिना खान या कार्यक्रमामार्फत टेलिव्हिजनवर निर्माती बनली आहे. 

Also Read : ​राम कपूरने त्याच्या वजनाबाबत घेतला हा निर्णय

Web Title: In the role of Manoraj Singh in Crossroads of Zindagi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.