'होणार सून मी या घरची' फेम रोहिणी हट्टंगडी यांचे छोट्या पडद्यावर कमबॅक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2020 06:30 IST2020-02-01T06:30:00+5:302020-02-01T06:30:00+5:30

अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी आता पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर प्रेक्षकांना पहायला मिळणार आहेत.

Rohini Huttangadi's comeback on the small screen after 'Gona Soon I Gharchi' | 'होणार सून मी या घरची' फेम रोहिणी हट्टंगडी यांचे छोट्या पडद्यावर कमबॅक

'होणार सून मी या घरची' फेम रोहिणी हट्टंगडी यांचे छोट्या पडद्यावर कमबॅक


'होणार सून मी या घरची'मधील आई आजी असो, किंवा 'चार दिवस सासूचे' मालिकेतील सासू; रोहिणी हट्टंगडी या नावाची जादू नेहमी निराळीच असते. सगळ्यांची लाडकी आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी आता पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर दिसणार आहेत. 


'होणार सून मी या घरची'मधील जान्हवीच्या आजे सासूच्या भूमिकेतून रोहिणी हट्टंगडी यांनी रसिकांच्या मनात घर केलं. मालिकेनं निरोप घेऊन बराच काळ उलटला आहे. तरीदेखील आजही ही व्यक्तीरेखा प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात आहे. आता त्या 'झी युवा' वाहिनीवर एका खट्याळ आजीच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.


कडक आणि शिस्तप्रिय सासू म्हणून आणि प्रेमळ आजी म्हणून याआधी अनेकदा रोहिणी हट्टंगडी यांना प्रेक्षकांनी पाहिलेलं आहे. या अष्टपैलू अभिनेत्रीला आता एका वेगळ्या भूमिकेत पाहण्याची संधी मिळणार आहे. 'डॉक्टर डॉन' मालिकेतील या आजीचा लुक कसा असेल, याविषयी सगळ्यांनाच खूप उत्सुकता आहे.


'डॉक्टर डॉन' या मालिकेच्या निमित्ताने एक मॉडर्न आजी रोहिणी हट्टंगडी साकारणार आहेत. आजवर त्यांनी साकारलेल्या भूमिकांपेक्षा निराळी आणि मजेशीर अशी ही भूमिका असेल. त्यांना एका अफलातून लुकमध्ये पाहण्याची संधी सुद्धा त्यांच्या चाहत्यांना मिळणार आहे. उत्कृष्ट अभिनय आणि विशेष लुकचं सरप्राईज अशी दुहेरी धमाल सगळ्यांना अनुभवायला मिळणार आहे.

Web Title: Rohini Huttangadi's comeback on the small screen after 'Gona Soon I Gharchi'