तर ही असणार सुरज राठीची मुलगी कनक राठी,‘तू सूरज मैं सांज पिया जी’ मालिकेत रिया शर्माची वर्णी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2017 14:51 IST2017-02-27T09:21:38+5:302017-02-27T14:51:38+5:30

'दिया और बाती हम'च्या ‘तू सूरज मैं सांज पिया जी’ नव्या सीझनमध्ये नवीन चेह-यांसह छोट्या पडद्यावर राठी परिवार रसिकांच्या ...

Riya Sharma's daughter Suraj Rathi's daughter Kanak Rathi, 'Suraj Mein Sanj Piya ji' | तर ही असणार सुरज राठीची मुलगी कनक राठी,‘तू सूरज मैं सांज पिया जी’ मालिकेत रिया शर्माची वर्णी

तर ही असणार सुरज राठीची मुलगी कनक राठी,‘तू सूरज मैं सांज पिया जी’ मालिकेत रिया शर्माची वर्णी

'
;दिया और बाती हम'च्या ‘तू सूरज मैं सांज पिया जी’ नव्या सीझनमध्ये नवीन चेह-यांसह छोट्या पडद्यावर राठी परिवार रसिकांच्या भेटीला येणार आहेत. यांत भाभोची भूमिका साकारणारी निलु वाघेला सोडली तर बाकी सगळे नवीन चेहरेच रसिकांचे मनोरंजन करताना दिसतील.यांत रिया शर्मा ही अभिनेत्री आता सुरज राठीची मुलगी कनक राठीच्या भूमिकेत झळकणार आहे.



रियाने यापूर्वी इतना करो ना मुझसे प्यार, ये है आशिकी, कहानी हमारी दिल दोस्ती दिवानेपन की,या मालिकेत वेगवेगळ्या भूमिकेत झळकली होती. मात्र रियाला 'इतना करो ना मुझे  प्यार' या मालिकेने रियाला खरी लोकप्रियता मिळवून दिली. या नवीन भूमिकेत रिया झळकणार असल्यामुळे एक वेगळाच उत्साह तिच्यात पाहायला मिळतोय. दिया और बाती हममध्ये सुरज राठी हा हलवाईचा व्यवसाय करत असतो. त्याचप्रमाणे रियालाही मिठाई बनवण्याचे आवड असते. अगदी बिनधास्त, मनमौजी,हसत खेळत असणारी कनक तुम्हाला या नव्या सिझनमध्ये पाहायला मिळणार आहे.सध्या मालिकेच्या काही भागाचे शुटिंग केरळमध्ये सुरू आहे.सूरज आणि संध्याच्या मृत्यूनंतर मालिकेची कथा 20 वर्षांनी पुढे जाईल. सिक्वेलमध्ये अनेक पॉजिटिव्ह गोष्टी रसिकांना पाहायला मिळतील. मालिकेची थीम पॉजिटिव्ह आहे. 'दिया और बाती हम' मालिकेने रसिकांचा निरोप घेतला होता, आता सात महिन्यांनंतर ही मालिका नव्या रुपात नव्या ढंगात छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहे.सूज आणि संध्या यांच्यावर पहिला सिझनची कथा आधारित होती. जिथे पहिला सिझन संपला तिथूनच नव्या सिझनच्या कथेला सुरूवता होणार आहे. त्यामुळे मालिकेत तिसरी पिढी काय कमाल करते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

Web Title: Riya Sharma's daughter Suraj Rathi's daughter Kanak Rathi, 'Suraj Mein Sanj Piya ji'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.