'बिग बॉस मराठी' होस्ट करण्यासाठी सलमान खानकडून मिळाल्या टिप्स? रितेश देशमुख म्हणाला..
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 15:48 IST2026-01-07T15:47:21+5:302026-01-07T15:48:08+5:30
'बिग बॉस मराठी'च्या होस्टिंगसाठी सलमान खाननं काय दिला सल्ला, रितेश म्हणाला..

'बिग बॉस मराठी' होस्ट करण्यासाठी सलमान खानकडून मिळाल्या टिप्स? रितेश देशमुख म्हणाला..
Riteish Deshmukh Bigg Boss Marathi Season 6 : रितेश देशमुख प्रेक्षकांचा लाडका अभिनेता आहे. अभिनयाबरोबरच रितेश देशमुखनं दिग्दर्शनही केलंय. रितेश गेल्या वर्षी एका नवीन भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्याने 'बिग बॉस मराठी'चा सूत्रसंचालक म्हणून जबाबदारी पार पाडली होती. पाचव्या पर्वाचे यशस्वीपणे होस्टिंग केल्यानंतर आता रितेश देशमुख पुन्हा एकदा 'बिग बॉस मराठी'च्या सहाव्या पर्वाचं आपल्या 'लयभारी' स्टाईलने होस्टिग करताना दिसणार आहे. रितेश भाऊला पुन्हा एकदा 'लयभारी' स्टाईलने 'बिग बॉस'चं होस्टिंग करताना पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत. अवघा महाराष्ट्र रितेशला प्रेमाने 'रितेश भाऊ' म्हणतो, पण रितेश स्वतः ज्यांना आपला मोठा भाऊ मानतो, तो म्हणजे बॉलिवूडचा 'भाईजान' सलमान खान. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रितेशने सलमान खानसोबतच्या नात्यावर आणि 'बिग बॉस'च्या होस्टिंगवर भाष्य केले आहे.
'लोकमत फिल्मी' ला दिलेल्या एका विशेष मुलाखतीमध्ये रितेशला 'बिग बॉस' संदर्भात एक प्रश्न विचारण्यात आला. रितेश जेव्हा 'बिग बॉस हिंदी १९' च्या ग्रॅड फिनालेमध्ये 'बिग बॉस मराठी ६' च्या लाँचिंगसाठी गेला होता, तेव्हा सलमान खानने त्याला काही विशेष सल्ला दिला का? यावर उत्तर देताना रितेश म्हणाला, "त्यांनी प्रेमचं दिलंय. ते सहसा कुणाला सल्ले देत नाहीत. त्यांच्या बऱ्याच गोष्टी पाहून शिकण्यासारख्या आहेत, त्या मी करतो", असं रितेशनं म्हटलं. दरम्यान, सलमान खान गेल्या अनेक वर्षांपासून 'बिग बॉस हिंदी'चं यशस्वी होस्टिंग करत आहे.
कुठे आणि किती वाजता पाहता येणार?
'बिग बॉस मराठी'चं सहावं पर्व येत्या ११ जानेवारीपासून कलर्स मराठीवर रात्री ८ वाजता प्रेक्षकांना पाहता येणार आहे. यंदाची थीम आणि खेळ हा स्पर्धकांना चकवा देणारा असणार आहे. प्रत्येक क्षणी खेळाचा डाव बदलू शकतो. नव्या रूपात, नव्या रचनेत आणि नव्या खेळाच्या नियमांसह 'बिग बॉस मराठी'चं घर सादर होत आहे. त्यामुळे स्पर्धकांना सावध राहून अगदी हुशारीने खेळ खेळावा लागणार आहे. "दार उघडणार... नशिबाचा गेम पालटणार!" या रोमांचक थीमसह घर स्पर्धकांच्या स्वागतासाठी सज्ज झालं आहे.