Bigg Boss Marathi 6 चं कोणत्या नेत्याला तिकीट मिळालं? रितेश देशमुख म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 14:57 IST2026-01-06T14:55:45+5:302026-01-06T14:57:26+5:30
प्रत्येक नव्या पर्वासोबत प्रेक्षकांना सर्वाधिक उत्सुकता असते ती घरात जाणाऱ्या स्पर्धकांची. अधिकृत घोषणा अजून झालेली नसली तरी सोशल मीडियावर काही नावांची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.

Bigg Boss Marathi 6 चं कोणत्या नेत्याला तिकीट मिळालं? रितेश देशमुख म्हणाला...
Bigg Boss Marathi Season 6 :सध्या प्रेक्षकांमध्ये 'बिग बॉस मराठी'च्या सहाव्या पर्वाबद्दल चर्चा सुरु आहे. अभिनेता रितेश देशमुख यंदाच्या पर्वाचा होस्ट असणार आहे. हे सहावं पर्व येत्या ११ जानेवरीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रत्येक नव्या पर्वासोबत प्रेक्षकांना सर्वाधिक उत्सुकता असते ती घरात जाणाऱ्या स्पर्धकांची. अधिकृत घोषणा अजून झालेली नसली तरी सोशल मीडियावर काही नावांची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.
नुकतंच 'बिग बॉस'ची ग्रँड प्रेस कॉन्फरन्स पार पडली. ही प्रेस कॉन्फरन्स जान्हवी किल्लेकरनं होस्ट केली. यावेळी रितेश देशमुखला 'बिग बॉस मराठी ६'च्या घरातील राजकीय नेत्यांच्या एन्ट्रीबद्दल प्रश्न विचारण्यात आले, तेव्हा त्याने अत्यंत मिश्किल उत्तर दिले. त्याच्या या उत्तराची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
"राज्यात सध्या निवडणुकांचे वारे वाहत असताना 'बिग बॉस'च्या घराचं तिकीट कोणाला मिळालंय का?" या प्रश्नावर रितेशनं दिलेलं उत्तर चर्चेत आलंय. तो म्हणाला, "ज्यांना राजकीय पक्षाचं तिकीट मिळालं नाही, त्यांना बहुतेक ही तिकीटं मिळतील. खरं सांगायचं झालं तर, मला अजूनतरी याबद्दल कल्पना नाही. समजा एखाद्याला पक्षाचं तिकीट मिळालं नसेल तर इथे मिळू शकेल की नाही हे सुद्धा माहिती नाही". यावर "राजकीय पक्षाचं तिकीट मिळवण सोपं आहे, पण बिग बॉसचं जास्त कठीण" असं जान्हवी किल्लेकरनं म्हटलं.
कुठे आणि किती वाजता पाहता येणार?
'बिग बॉस मराठी ६'ची थीम आणि खेळ हा स्पर्धकांना चकवा देणारा असणार आहे. प्रत्येक क्षणी खेळाचा डाव बदलू शकतो. त्यामुळे स्पर्धकांना सावध राहून अगदी हुशारीने खेळ खेळावा लागणार आहे. यंदाचा खेळ केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नसून सदस्यांचे नशिब बदलणारा आहे. यंदा शोच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. कलर्स मराठी आणि जिओ हॉटस्टारवर रात्री ८ वाजता 'बिग बॉस मराठी ६' प्रेक्षकांना पाहता येणार आहे