Riteish Deshmukh : 'बिग बॉस मराठी ५'साठी रितेश देशमुख घेतोय इतकं मानधन, आकडा पाहून व्हाल चकीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2024 12:57 IST2024-08-02T12:56:42+5:302024-08-02T12:57:19+5:30

Bigg Boss Marathi Season 5: बिग बॉस मराठीचा नवा सीझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यंदाच्या शोचं सूत्रसंचालन महेश मांजरेकर करत नसून सर्वांचा लाडका अभिनेता रितेश देशमुख करत आहे.

Riteish Deshmukh is getting so much remuneration for 'Bigg Boss Marathi 5', you will be shocked to see the figure | Riteish Deshmukh : 'बिग बॉस मराठी ५'साठी रितेश देशमुख घेतोय इतकं मानधन, आकडा पाहून व्हाल चकीत

Riteish Deshmukh : 'बिग बॉस मराठी ५'साठी रितेश देशमुख घेतोय इतकं मानधन, आकडा पाहून व्हाल चकीत

Bigg Boss Marathi 5 : बिग बॉस मराठीचा नवा सीझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. बिग बॉसच्या घरात मजा, मस्तीसह भांडण, वाद आणि गॉसिप होताना दिसत आहे. यंदाच्या शोचं सूत्रसंचालन महेश मांजरेकर करत नसून सर्वांचा लाडका अभिनेता रितेश देशमुख करत आहे. प्रेक्षकांची रितेशच्या सूत्रसंचालनाला पसंती मिळत आहे. दरम्यान आता रितेशने या शोसाठी घेतलेल्या मानधनाचा आकडा समोर आला आहे.

फिल्मीबीटने दिलेल्या माहितीनुसार, बिग बॉस मराठी ४ शोच्या सूत्रसंचालनासाठी महेश मांजरेकर प्रत्येक एपिसोडसाठी २५ लाख रुपये घेत होते. आता रितेश प्रत्येक भागासाठी २५ लाखांपेक्षा जास्त मानधन घेत असल्याचे बोलले जात आहे. तो प्रत्येक एपिसोडसाठी सुमारे ३० ते ४० लाख रुपये मानधन घेत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे त्याचे एकूण मानधन दोन ते अडीच कोटींच्या जवळपास आहे. तर रितेश एका सिनेमासाठी सुमारे ७ ते ८ कोटी रुपये घेतो.


'बिग बॉस मराठी'चा पाचव्या सीझनचे सर्वत्र कौतुक होताना दिसून येत आहे. दररोज नवे सरप्राईज पाहायला मिळत आहेत. तसेच एक्स्ट्रा धमाल, एक्स्ट्रा मस्ती, एक्स्ट्रा गॅासिप्स, एक्स्ट्रा मसाला आणि एक्स्ट्रा भव्यता अशा सर्व गोष्टी यंदाच्या सीझनमध्ये पाहायला मिळत आहेत. पहिल्या दिवसापासूनच घरातील सदस्य एकमेकांसोबत चांगलेच भिडताना दिसत आहेत. तसेच सदस्य नेहमीच एकमेकांबद्दल गॉसिप करताना दिसून येतात. कधी कोण कोणाच्या बाजूने बोलेल आणि कधी कोण कोणाच्या विरोधात बोलेल हे सांगू शकत नाही. 

Web Title: Riteish Deshmukh is getting so much remuneration for 'Bigg Boss Marathi 5', you will be shocked to see the figure